छोट्या छोट्या आठवांची, सोबत ती किती असावी !! मी सहज लिहावे, जणू कविता ती व्हावी !! हळुवार त्या सरी, बरसत ती वेळ जावी !! ओढ त्या कोणाची, मग मज ती लागावी !! एकटा तो मी, एकटी ती वाट दिसावी !! सोबत येण्यास मग, नकळत का साथ मागावी ?? न यावी ती, न सोबत घेऊन जावी !! ओळख ती माझी, अनोळखी ती जणू वाटावी !! अव्यक्त प्रेमाची ही, कहाणी अधुरी का रहावी ?? नजरेतून ती बोलता, शब्दातून व्यक्त का करावी ?? छोट्या छोट्या गोष्टींनी, पुन्हा ती प्रेमात पाडावी !! मी सहज पाहावे, नी हरवून रात्र ती जावी !! ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*