"हरवलेल्या पत्रास आता
 कोणी पत्ता सांगेन का??
 खुप काही लिहलंय मनातल
 आता कोणी वाचेन का??

 काळाच्या धुळीत मिसळुन
 सगळं काही संपलय का??
 शोधुनही सापडेना काही
 वाट मी चुकतोय का??

 जड आहे भावनिक ओझे
 कोणी हलके करतेय का??
 अश्रूंचा ही एक थेंब मला
 आज पुन्हा रडवतोय का??

 पुसट झाली शब्द सारी
 आठवण आज तशीच का??
 जीर्ण झाले पत्र सारे
 वाट कोणी पाहतेय का??

 हरवलेल्या पत्रास आता
 कोणी पत्ता सांगेन का??"
 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE