"विस्कटलेलं हे नातं आपलं
 पुन्हा जोडावंस वाटलं मला!!
 पण हरवलेले क्षण आता
 पुन्हा सापडत नाहीत!!

 कधी दुर अंधुक आठवणीत
 तु दिसली होतीस मला!!
 वाटलं होतं पुन्हा भेटावं
 पण धीरच झाला नाही!!

 वाटा त्या जुन्या आजही
 खुनावत होत्या मला!!
 पण त्या वाटांवर चालताना
 मला तुच दिसली नाही!!

 एकांतात राहुन आजही
 बोलतं ते ह्रदय मला!!
 पण व्यक्त करायला तेव्हा
 मला तुच सापडत नाही!!

 डोळ्याच्या कडा आजही
 सांगतात ते अश्रुही मला!!
 हरवलेले ते क्षण आता
 पुन्हा सापडत नाही!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RSERVED*