Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कथा

स्वप्न ||अंतिम भाग || SWAPN MARATHI KATHA ||

Category कथा
स्वप्न ||अंतिम भाग || SWAPN MARATHI KATHA ||

Content

  • भाग ६
  • समाप्त
Share This:

भाग ६

“एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती हा प्रयत्न !!एक एक ओळ सुंदर व्हावी म्हणून मी तरी किती कागदांच्या पानांना चुरागळून टाकून द्यायचं! आणि हा अट्टाहास फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ना!! आज माझ्या लिखाणाचा शेवट माझा मुलगा आज समाज , देश यासाठी काही तरी करतो आहे याने व्हावा यापेक्षा दुसरी स्वप्नपूर्ती ती काय! पण आजही एक स्वप्न अधुरेच राहिले आणि ते कधीच पुरे झाले नाही. दादांच्या समोर मला कित्येक गोष्टी बोलायच्या होत्या. माझ्यातील एका यशस्वी लेखकाची त्याना भेट घडवायची होती. माझ्या उभरत्या काळात, त्याच्या सारखा दुसरा आत्मविश्वास देणारा कोणी नव्हता. आज ती खंत मला सतत बोलते. पण मुलाच्या या कार्याने मन शांत होते!! बघते पुन्हा स्वतःतील कित्येक स्वप्नात जे पूर्ण झाले, काही अधुरे राहिले!! पण आयुष्य म्हटलं की काहींना काही सुटनारच ना!! काही स्वप्न पुर्ण होतात, काही अधुरी राहतात!! माझ्या यशस्वी लेखकाची एक कादंबरी दादांच्या हाती द्यायचं स्वप्न अखेर आजही अधुरेच राहिले!! माझ्या स्वप्न या माझ्या आत्मचरित्रात हे स्वप्न अधुरेच राहिले!! पण पुरे झाले ते आभाळाला ही आनंदाने बरसायला सांगेन असे माझ्या मुलाचे स्वप्न !! एक बाप म्हणून त्यासारखा आनंद नाही!! “आप्पा लिहीत राहिले
“बरसल्या सरी अगणित वेळा
त्या शांत कराया मातीस
तूही प्रयत्न कर अगणित वेळा
मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस
कडाडली वीज अगणित वेळा
भेटायला त्या मातीस
तूही लख्ख प्रकाशित जा
चालायला त्या स्वप्न पुर्तीस
बरसून जा अगणित वेळा
अधुऱ्या त्या स्वप्नांच्या पूर्तीस ..!! ” आप्पा लिखाण करून शांत बसले.
कित्येक वेळ ते लिहिलेल्या त्या ओळी गुणगुणत राहिले.
“आप्पा !! ” सुनील बोलावू लागला.
“आलो रे सुनील!!” म्हणत आप्पा बाहेर गेले.
“काय रे !! “आप्पा.
“सकाळ झाली आणि तुम्ही अजुन लिहिताय !! आप्पा रात्रभर झोपला नाहीत ??”
” अरे लिहिण्यात इतका मग्न झालो की लक्षातच नाही आल!!” आप्पा बाहेरच्या अंगणात बघत म्हणाले.
“बरं चला !! आशीर्वाद द्या !! आणि सोबत चला आमच्या !! “सुनील आप्पांना बाहेर घेऊन येत म्हणाला.
“अरे पण कुठे ??” आप्पा विचारू लागले.
“चला तर सांगतो !! ” सुनील आप्पांना म्हणाला.
आप्पा आणि मंदा दोघांनाही घेऊन सुनील शाळेकडे चालू लागला. शाळा जवळ येताच सगळेच दिसू लागले. उमा , सारे मित्र , रखमा , सुहास , आजी, चंदा ,तारा आणि बोरुवस्तितल्या बायका आणि मुले , सारे वाटच पाहत थांबले होते.
“काय रे हे सुनील !!” आप्पा आणि मंदा दोघेही विचारू लागले.
“आई !! आप्पा !! या शाळेच्या नव्या स्वप्नाची वाट आता सुरू झाली आहे !! आमच्या सर्वांची इच्छा आहे की आप्पा तुम्ही आज या साऱ्यांना, आम्हाला मार्गदर्शन करावं !! आणि आमच्या नव्या वाटेस बळ द्यावं.!!” उमा म्हणाली.
“अरे पण !! ” आप्पा.
“पण नाही आणि काही नाही!! “उमा आणि सारे लोक त्या नव्या शाळेत बसले.
आप्पा साऱ्यां समोर उभा होते. त्यांना बोलायला.
“खरंतर मी काय बोलावं हाच खरा प्रश्न आहे !! तुम्ही मुल इतकी हुशार आहात की माझ्या शब्दांनाही कदाचित आज विचार करावा लागेल. स्त्री शिक्षण !! खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही!! माझ्या सारख्या लेखकाला एका स्त्रीने घडवल ती माझी आई !! तिला त्या जुन्या समाजाने शिकू नाही दिल पण तिने घडवलं आमचं घर !! मग स्त्री शिकली तर अजुन किती बदलून जाईल ना सारं हे !! मुलांनाही शिकायला हवं !! पण या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून शिकायला हवं !! धर्म शिक्षणाने कधीच बुडाला नाही !! उलट कोणताही धर्म आपल्याला प्रत्येकाला कसं जगायचं हे शिकवत असतो!! मग कोणता धर्म तुम्ही शिकू नका असे म्हणेन?? ” टाळ्यांचा आवाज सगळीकडे झाला.

” मी जास्त काहीच बोलत नाही !! पण मुलगी आणि मुलगा हा भेद विसरून जायला हवा !! तिलाही शिकायचा अधिकार आहे हे नक्की !! या शाळेत तुमच्या भविष्याची स्वप्न कित्येक घडणार आहेत!! त्या स्वप्नांना फक्त तुम्ही रंग भरा !! आयुष्य खूप सुंदर होईल!! ” आप्पा आपल बोलणं पूर्ण करून सर्वांना भेटू लागले.

कार्यक्रम आटोपून आप्पा आणि मंदा आता शाळेतून घराकडे जायला निघाले.

“मंदा !! खरंच आज सूनिलचा मला अभिमान वाटतो !!”
“मंद डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली.
“होणं !! खरंच !! स्वतःसाठी कोणीही जगेन !! पण समजासाठी जगणं खरंच खूप वेगळं!!”
आप्पा आणि मंदाला जाताना सुनील आणि उमा पाहू लागले. आत शाळा सुरू झाली. कित्येक मुले शाळेत शिकायला आले.
“उमा !! हे तर स्वप्न पूर्ण झालं !! पण अजुन एक तसंच राहील आहे !! ” सुनील उमाकडे पाहत म्हणाला.
“कोणते रे ??” उमा चेहऱ्यावर कित्येक भाव बदलत विचारू लागली.
“तुझ्या सोबत सार आयुष्य जगायचं स्वप्न !! ते तू हो म्हणालीस तर पूर्ण होईल !!” सुनील हसत म्हणाला.
उमा थोडा वेळ शांत झाली. सूनिलकडे हसत पाहत म्हणाली.
” माझं ही एक स्वप्न आहे !! आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची !! तू हो म्हणालास तर पूर्ण होईल !! “
उमा असे म्हणताच दोघेही मनसोक्त हसले. एकमेकांकडे पाहत राहिले. मागे शाळेतून आवाज येऊ लागले.
” तर लक्षात असू द्या !! अ अननसाचा !! कशाचा सांगा बरं !! ” वर्गातून सुहासचा आवाज येत होता.
“अननसाचा !! ” सगळे विद्यार्थी एकदम म्हणाले.

समाप्त

स्वप्न || कथा भाग ५ ||
स्वप्न || कथा भाग १ ||

Yogesh Khajandar

Author || Content Writer || Blogger ||

Tags स्वप्न ..!! (अंतिम भाग) Marathi Katha marathi ranjak katha

RECENTLY ADDED

वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

श्री कालीमाता

श्री कालीमाता आरती || Aarati || Devotional ||

मंगल की सेवा सुन मेरी देवा, हाथ जोड तेरे द्वार खडे। पान सुपारी ध्वजा नारियल ले ज्वाला तेरी भेट करे. सुन जगदम्बा न कर विलम्बा, संतन के भडांर भरे। सन्तन प्रतिपाली सदा खुशहाली, जय काली कल्याण करे ।।
low angle photo of brown temple

श्रीसूर्यकवचस्तोत्रम् || ShriSuryakavachastotram || DEVOTIONAL ||

श्री गणेशाय नमः I याज्ञवल्क्य उवाच I श्रुणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभम् I शरीरारोग्यदं दिव्यं सर्व सौभाग्यदायकम् II १ II दैदिप्यमानं मुकुटं स्फ़ुरन्मकरकुण्डलम् I ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतदुदीरयेत् II २ II
Dinvishesh

दिनविशेष ७ मे || Dinvishesh 7 May ||

१. मुंबई ते टोकियो विमानसेवा एअर इंडियाने सुरू केली. (१९५५) २. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचे पेटंट केले. (१८६७) ३. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०) ४. इराकने तेहरानच्या तेल साठ्यांवर बॉम्ब हल्ले केले. (१९८६) ५. मुंबईमध्ये विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. (१९०७)
brown wooden cubes

मी पणा || MARATHI KAVITA ||

माझं माझं करताना आयुष्य हे असचं जातं पैसा कमावत शेवटी नातं ही विसरुन जातं राहतं काय अखेर राख ही वाहुन जातं स्मशानात गर्व ही आगीत जळून जातं
wistful black woman hugging stressed husband in bathroom

नातं माझं || NAAT MAJH || MARATHI BLOG ||

नातं एक असच होतं कधी दुख कधी सुख होतं सुखाच तिथे घर होतं आणि मनात माझं प्रेम होतं कधी माफी कधी रुसन होतं क्षणात सारं जग होतं दुख कुठे पसार होतं आनंदाने नातं राहतं होतं

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest