"न भेटली इथे न भेटली तिथे स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे!! कधी शोधले तिथे कधी शोधले इथे सांग तुझा ठाव आहे तरी कुठे!! भास होता जसे कधी आभास दिसे तुझ्या नसण्याचे दुःख बोलू तरी कुठे!! हे होता जरी असे होते का पुन्हा तसे तुझ्या जवळ येण्या वाट आहे तरी कुठे!! मला न कळे कळले ना कसे नकळत ही तू मज बोलते तरी कुठे!! हो आहे आजही तिथे एकटा मी जिथे पुढे जाण्या पुन्हा सोबती ना तु कुठे!! राहिल्या पुन्हा इथे आठवणी विरल्या जिथे अश्रू पुन्हा विचारता त्यांना लपवू तरी कुठे!! वचन दिले जेव्हा जिथे क्षण पुन्हा भेटले तिथे त्यास सांगण्या मनातले शब्द लिहू तरी कुठे!! न भेटली इथे न भेटली तिथे स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे ..!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
