स्वप्नांच्या पलीकडे || SWAPNANCHYA PALIKADE || POEM ||

Share This
"स्वप्नांच्या ही पलिकडे
 एक घर आहे तुझे
 त्या घरात मला एकदा यायचं आहे!!

 तुझ्या आठवणीच्या पडद्यावर
 मनसोक्त एकदा फिरताना
 झुळूक होऊन मला एकदा जायचं आहे!!

 हरवून जाईल कधी ती सांज
 ओल्या मनातील भावनेत
 त्या भावनेतील ओल मला व्हायचं आहे!!

 कधी एकांती, कधी तुझ्या सोबत
 कधी अबोल, तर कधी खूप बोलत
 तुझ्या गप्पांमध्ये मला हरवून जायचं आहे!!

 ही दुनिया थोडी अतरंगी
 तुझ्या आवडत्या रंगाने भरली
 त्या रंगातील एक रंग मला बनायचं आहे!!

 कधी दूर असेन ,कधी जवळ तुझ्या
 साथ माझी असेल, कधी विरह असेन जरा
 त्या विरहातील ओढ मला व्हायचं आहे!!

 साथ तुझी द्यायला, सोबत माझी व्हायला
 तुला आपलेसे करायला , मला तुझ्यात हरवून जायला
 त्या घरात मला एकदा यायचं आहे..!!!"

 ✍ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओ…
Read More

बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

“कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार …
Read More

एक लाट. !! EK LAAT

अलगद स्पर्श करून जाणारी समुद्राची ती एक लाट प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी पाहात होती माझीच वाट…
Read More

कोजागिरी || KOJAGIRI MARATHI CHAROLYA ||

चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा पसरून चोहीकडे हरवला तो बावरा लख्ख प्र…
Read More

Next Post

शब्दाचिया नावे ... || SHABDACHIYA NAVE ||

Fri Mar 30 , 2018
शब्दांचिया नावे उगाच दोष जातो कवितेत एक भाव तूच आहेस तुझेच आहे दिसणे यात नी तुझेच आहेत भास यास उगाच खाती भाव ती ओळ शब्दाची त्यात सौदर्य ही तूच आहेस