FavoriteLoadingAdd to favorites
"स्वप्नांच्या ही पलिकडे
 एक घर आहे तुझे
 त्या घरात मला एकदा यायचं आहे!!

 तुझ्या आठवणीच्या पडद्यावर
 मनसोक्त एकदा फिरताना
 झुळूक होऊन मला एकदा जायचं आहे!!

 हरवून जाईल कधी ती सांज
 ओल्या मनातील भावनेत
 त्या भावनेतील ओल मला व्हायचं आहे!!

 कधी एकांती, कधी तुझ्या सोबत
 कधी अबोल, तर कधी खूप बोलत
 तुझ्या गप्पांमध्ये मला हरवून जायचं आहे!!

 ही दुनिया थोडी अतरंगी
 तुझ्या आवडत्या रंगाने भरली
 त्या रंगातील एक रंग मला बनायचं आहे!!

 कधी दूर असेन ,कधी जवळ तुझ्या
 साथ माझी असेल, कधी विरह असेन जरा
 त्या विरहातील ओढ मला व्हायचं आहे!!

 साथ तुझी द्यायला, सोबत माझी व्हायला
 तुला आपलेसे करायला , मला तुझ्यात हरवून जायला
 त्या घरात मला एकदा यायचं आहे..!!!"

 ✍ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

संवाद ..!

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !वादच होत नाहीत !!कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यातसंवादच होत नाहीत !! ओळख…
Read More

बावरे मन ..✍️

“कळावे कसे मनास आतातू आता पुन्हा येणार नाहीससांगितले तरी त्या वेड्या मनासते खरं केव्हाच वाटणार नाही …
Read More

हळुवार क्षणात..✍️

अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत…
Read More

एक लाट. !! EK LAAT

अलगद स्पर्श करून जाणारी समुद्राची ती एक लाट प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी पाहात होती माझीच वाट…
Read More

स्वप्नातली परी..👸

न भेटली इथे न भेटली तिथे स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे कधी शोधले तिथे कधी शोधले इथे सांग तुझा …
Read More

कोजागिरी

चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा पसरून चोहीकडे हरवला तो बावरा लख्ख प्र…
Read More

2 thoughts on “स्वप्नांच्या पलीकडे || SWAPNANCHYA PALIKADE || POEM ||”

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा