स्वतः स शोधताना ..!! Women’s Day

आज जागतिक महिला दिनानिमित्त एक स्त्री आपलं वेगळेपण शोधायला निघाली. कधी ती एक लहान मुलगी होऊन आपल्याच बाबांना भेटली , कधी एक युवती होऊन सासरी जाणाऱ्या स्वतः ला भेटली, तर कधी आई होऊन आपल्या मुलांना भेटली , जणू स्वतः ला आरश्यात पाहून आली .. एक स्त्री आज मुक्त फिरून आली. आपलं स्त्रित्व जगून आली .. अगदी मनापासून …

माझ्यातल्या "मी" ला
 शोधायचं आहे मला!!
 मी एक स्त्री आहे
 खूप बोलायचं आहे मला!!

 मी जननी आहे मी मुलगी आहे
 तरी स्वत:ला पहायचं आहे मला!!
 कधी पंख पसरून या नभात
 मुक्त फिरायच आहे मला!!

 कधी क्षणास फिरवून
 बाबांची परी व्ह्यायच आहे मला!!
 त्या हसऱ्या परीला
 काही बोलायचं आहे मला!!

 शोधता शोधत कधी उगाच
 हरवायच आहे मला!!
 सासरी चाललेल्या माझ्या डोळ्यातील
 अश्रू पाहायचे आहेत मला!!

 ममत्व माझे पाहताना
 माझ्या बाळास बोलायचं आहे मला!!
 आई म्हणून घडवताना
 माझ्या मिठीत घ्यायचे आहे मला!!

 एक स्त्री शोधताना
 माझेच भेटले मी मला!!
 कधी मुलगी होऊन , कधी आई होऊन
 आरश्यात पाहिले मी मला!!

 बायको म्हणून जगताना
 शोधू कसे मी मला!!
 माझा मधल्या स्त्रीला
 वेगळे पाहू कुठे मी मला??

 ✍ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

कविता संसाराची!! || KAVITA SANSARACHI || POEM ||

Fri Mar 9 , 2018
संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी