आज जागतिक महिला दिनानिमित्त एक स्त्री आपलं वेगळेपण शोधायला निघाली. कधी ती एक लहान मुलगी होऊन आपल्याच बाबांना भेटली , कधी एक युवती होऊन सासरी जाणाऱ्या स्वतः ला भेटली, तर कधी आई होऊन आपल्या मुलांना भेटली , जणू स्वतः ला आरश्यात पाहून आली .. एक स्त्री आज मुक्त फिरून आली. आपलं स्त्रित्व जगून आली .. अगदी मनापासून …

माझ्यातल्या "मी" ला
 शोधायचं आहे मला!!
 मी एक स्त्री आहे
 खूप बोलायचं आहे मला!!

 मी जननी आहे मी मुलगी आहे
 तरी स्वत:ला पहायचं आहे मला!!
 कधी पंख पसरून या नभात
 मुक्त फिरायच आहे मला!!

 कधी क्षणास फिरवून
 बाबांची परी व्ह्यायच आहे मला!!
 त्या हसऱ्या परीला
 काही बोलायचं आहे मला!!

 शोधता शोधत कधी उगाच
 हरवायच आहे मला!!
 सासरी चाललेल्या माझ्या डोळ्यातील
 अश्रू पाहायचे आहेत मला!!

 ममत्व माझे पाहताना
 माझ्या बाळास बोलायचं आहे मला!!
 आई म्हणून घडवताना
 माझ्या मिठीत घ्यायचे आहे मला!!

 एक स्त्री शोधताना
 माझेच भेटले मी मला!!
 कधी मुलगी होऊन , कधी आई होऊन
 आरश्यात पाहिले मी मला!!

 बायको म्हणून जगताना
 शोधू कसे मी मला!!
 माझा मधल्या स्त्रीला
 वेगळे पाहू कुठे मी मला??

 ✍ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

जिथे मी उरावे !!

आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read More

राजकारण ..🙏

“भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं ना…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा