आठवणींच्या जगात आज मी सहजच हरवून गेलो आहे!! पण भारतमाते तुला रक्षण्या मी निडर होऊन इथे उभा आहे!! आठवण त्या मातेची येते जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे!! पण त्या मातेस तुला रक्षण्याचे वचन मी देऊन आलो आहे!! कुठे खांद्यावर हलकेच माझ्या तो हात मखमली जाणवला आहे!! पण भारतमाते मला उमगले आईचे दुसरे रूप ही तू आहे!! हो पाहते वाट माझी सखी तिच्या नजरेत मी आज आहे!! पण ती ओढ मग तुझ्या प्रेमाची मला पुन्हा पुन्हा बोलते आहे!! अनोळखी त्या शत्रू सोबत मी अखेर पर्यंत लढणार आहे!! पण मनात मला माझ्या मित्रांची साथ नेहमीच भेटते आहे!! एक सैनिक होऊन जगताना मी तुला कित्येक वेळा वंदन करतो आहे! हे भारतमाते तुला रक्षण्या हे आयुष्य माझे मी दिले आहे!! हे भारतमाते तुला रक्षण्या हे आयुष्य माझे मी दिले आहे!! ✍योगेश *ALL RIGHTS RESERVED*
