"अस्तास चालला सूर्य
जणु परका मज का भासे!!
रोज भेटतो मज यावेळी
तरी अनोळखी मज का वाटे!!
ती किरणांची लांब रेष
मज एकटीच आज का भासे!!
झाडा खालचे मंद दिवे मज
आपुलकीचे आज का वाटे!!
परतीस चालली पाखरे
घराची ओढ मनात का दाटे!!
कोण पाहतो वाट त्याची
सुर्यासही विचारावेसे वाटे!!
कधी नारंगी कधी गुलाबी
रंगाची उधळण करत जाते!!
काळ्याभोर अंधाराची नभात
सुरुवात होतं अशीच जाते!!
कोणाची सुंदर संध्याकाळ
कोणास ऐकटेपणा का भासे!!
लांबलेल्या सावल्यात का कोण
स्वतःस हरवतं यातं का जाते!!
अस्तास चालला सुर्य
जणु परका मज का भासे..!!"
-योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*