सुर्यास्त || कथा भाग ५ || LOVE STORY ||

भाग ५

समीर आता कोणाशीच जास्त बोलत न्हवता. सायली आणि त्याच्यामध्ये आता बोलण पूर्ण बंद झाल होत. पण ते नात जे कोमेजून गेलं होत त्याला आता कुठेतरी विसरायचं होत. सायली पण आता समीरकडे जास्त येतं जात न्हवती. इतकं सुंदर नात गैरसमजातून उध्वस्त झाल होत. समीर आता दुसऱ्या गावाला जाण्यासाठी विचार करत होता. कदाचित समोर असलेल्या सायलीला विसरायचं होत.म्हणूनच इथून त्याला बाहेर जायचं होत.

“आई!! मला तुझ्याशी बोलायचं होत थोडं!!” समीर अचानक आईला बोलत म्हणाला.
“बोल ना समीर!! काय झालं!!”
“आई मी परगावी जाण्याचा विचार करतोय नोकरीसाठी!! एका ठिकाणी मला चांगली संधीही चालून आली आहे !!”
“समीर !! अरे तू हे काय म्हणतोय !! परगावी !! या आईला सोडून जावं वाटेनं का रे तुला??” आई डोळ्यात अश्रू पुसत म्हणाली.
आई अशी म्हणताचं समीरला अश्रू अनावर झाले.
“नाही आई !! पण संधी चांगली आहे !! आणि तूही ये ना तिकडेच नंतर !!! ” समीर स्वतःला सावरत म्हणाला.
” अरे !!पण जावच लागेल का??”
“हो आई!! संधी चांगली आहे !!! “
“तुझ चांगलं होणार असेन तर मी नाही अडवणार तुला जा तू!!!” समीरची आई मनाला सावरत म्हणत होती. तिला त्याला अडवायच न्हवत. पण त्याचा विरह सहन करण्याची ताकद तिच्यात न्हवती.

कित्येक वेळ आई आणि समीर बोलत होते. सायली अचानक घरात येताना समीरला दिसताच तसेच समीर बाहेर निघून जाऊ लागला.
“काकु!! ” समीरची आई आतून बाहेर येत होती. समीर न बोलताच बाहेर निघून गेला होता.
“काय सायली !! “
“काकु काम होते तुमच्याकडे!!” सायली समीरच्या आईला अश्रू पुसताना पहात म्हणाली.
“काकु तुमचा चेहरा आज थोडा उदास का वाटतोय !! काहीं झाल का ??” सायली ने समीरच्या आईचे भाव बरोबर टिपले होते.
“काही नाही सायली !! मुलगा आपल्या पासून दूर जातोय म्हटलं की आईला त्रास होतोच !! “
“म्हणजे काय काकु!!”
“समीर परगावी जातोय !! नोकरीसाठी!! ” समीरची आई असे म्हणताच सायलीला काय बोलावे तेच कळेना.
“पण अचानक कसकाय??”
“चांगली संधी आहे म्हणाला!! मला ही त्याला अडवाव वाटलं नाही !! शेवटी मीही एक आईच ना , मुलाच्या विरहाच्या विचारानेच डोळ्यात अश्रू आले!! पण त्याच चांगलं होत असेन तर मी कशाला अडवू!!” समीरची आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. सायली कित्येक वेळ भानावरच न्हवती.
“तुझ काही काम होत म्हणालीस!!!” समीरची आई सायलीला विचारत होती.
“हो काकु !! पण विसरले मी काय काम होत ते!! मी नंतर येते !!!” अस म्हणत सायली तिथून बाहेर पडली.

सायली कित्येक वेळ घराच्या बाहेरच समीरच्या विचारात आणि तो येण्याची वाट पहात थांबली. असा कसा कसा जाऊ शकतो समीर. त्याला एकदाही हा निर्णय मला सांगावा अस वाटल नाही. का वागत असेन तो असा माझ्याशी? पण मला तरी त्रास का व्हावा त्याच्या जाण्याचा. मी इथे का थांबली आहे त्याची वाट पाहत. का?? मी प्रेम तर नाहीना करत त्याच्यावर.!! नाही नाही!! मी वाईट आहे समीरच्या नजरेत मी वाईट आहे. मी नाही बोलणार त्याला. तो माझ्यामुळेच चालला आहे दुर!! असा कसा वागू शकतो तो!! पण मी का म्हणून बोलू त्याच्याशी!! कित्येक वेळा मी समोर आले त्याच्या तरीही तो मला बोला नाही. वाढदिवसाला ही आला नाही. नाही नको !! मी बोलले तर परत म्हणेन की मी मागे मागे असते म्हणून!! नाही नकोच !! हो मी मान्य करते की मी करते प्रेम त्याच्यावर !! पण मीच का बोलायचं!! नाही मी नाही बोलणार!! तो जाणार असेन तर जाऊदे !! त्याच्या नसण्याचे दुःख मी सहन करेन पण मी नाही बोलणार त्याला !! समीर एवढं छान नात आपल अस का रे तुटलं सांग तरी!! मी नाही बोलले तरी तू बोल !! माझ्या मनात फक्त तूच आहेस!! पण मला वाईट समजून तू माझ्याशी अस नकोस वागू रे !! मी नाहीये वाईट!!

असंख्य विचारांचा कल्लोळ चालू होता सायली फक्त विचार करत होती. समीर पुन्हा तिच्या समोर यावा आणि तिला बोलावा एवढंच तिला हवं होत. मनातल सार काही बोलायचं होत. पण मीच का ?? हेच फक्त अडवत होत. सायली विचार करत असताना समीर तिच्या अचानक समोरून जाताना तिला दिसला. त्यानं पाहिलं तिच्याकडे पण तो बोलला नाही. सायली फक्त बघतच राहिली.
समीर घरात निघूनही गेला. सायली तिथेच उभी होती. तिला वाटलं होत समीर तिला सांगेन की तो चाललाय पण तो बोललाच नाही.
घरी समीर गेला आणि सायली बद्दल मनात असंख्य विचारांमध्ये दंग होऊन गेला. कशासाठी सांगू मी तिला, की मी आता कायमचा निघून जातोय इथून!! त्याचा काही फरक पडणार नाहीये आता !! ती पाठमोरी जातानाच जेव्हा तिच्यासाठी कविता लिहिली तेव्हाच ती माझ्या मनात घर करून राहिली होती!! प्रत्येक क्षण एकमेकांना सांगणारे आम्ही , पण ती काहीच सांगत न्हवती!! मग मी का सांगू की मी आता इथून निघून जातोय!! आणि असही मी गेलो तरी काय फरक पडणार आहे तिला !! तुषार आहेच ना तिच्या आयुष्यात!! नाही मी नाही सांगणार तिला की मी आता इथे राहणार नाही ते !! मला तिला विसराव लागेन !!आणि ती अशीच समोर राहिली माझ्या तर मी कधीच नाही विसरू शकणार तिला !! तिच्यावर माझ प्रेम कायम असेन पण तिच्या आयुष्यात आता मी कुठेच नसेन..!! माझ्या किवितेतून फक्त तिलाच शब्द बोलतील !! पण ते तिला कधीच कळणार नाहीत !! नाही मला तिला आता विसरावंच लागेन !!!!

समीर असंख्य विचारत हरवुन गेला होता. त्याला सायलीला विसरायचं होत…!!

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *