सुर्यास्त || कथा भाग २ || SURYAST PART 2 ||

भाग २

“काहीही म्हणते आई !! ” समीर मनातल्या मनात म्हणाला.

सायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच होत असे. तो सतत तिच्या नजरेस पडत असे. दोघांमध्ये येता जाता बोलण होत.
“समीर अरे मला तुझी थोडी मदत हवी होती!!” सायली जाणाऱ्या समीरकडे पाहत म्हणाली.
“अरे वाह !! सायलीला चक्क माझी गरज पडावी!! क्या बात है!! ” समीर सायलीकडे हसत म्हणाला.
” हो अरे !! मला काही विचारायचं होते तुला !! “
” विचार ना !! ” समीर उत्सुकतेने म्हणाला.
“नाही जाऊदे !! नंतर विचारते !!! आत्ता नको!! “
“सायली विचार तरी !!!” समीर सायलीला म्हणाला.
“समीर माणूस प्रेमात पडलेले कसे कळते रे !!” सायली अचानक म्हणून गेली.
समीरला या प्रश्नाचं उत्तर कसे द्यावे तेच कळतं न्हवते. तो कित्येक वेळ शांत राहिला.
“तुला का हे विचारावं वाटलं सायली? कोणाच्या प्रेमात पडली आहेस का??
” नाहीरे !! असं काही नाही .!! सहजच विचारते तुला मी!! “
“पण सायली प्रेमात पडलेले कळतं अस नाही !! पण ते लक्षात येत असही नाही!! तु कदाचित कोणाशी प्रेम करत ही असावीस पण तुला ते तेव्हाच कळेल जेव्हा तुला त्या व्यक्तीचं असणं आनंद देईन आणि त्याचा विरह अश्रू!! ” समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
“समीर तु प्रेम करतोस कोणावर??”

समीर काहीच न बोलता निघून गेला. कित्येक वेळ सायली त्याच्या प्रेमाची व्याख्या आठवत होती. आनंद आणि अश्रू यातच प्रेम कसे असेल? याचा हिशोब ती करत होती. कदाचित समीरला काहीतरी बोलायचं असेन पण ते शब्द कुठेतरी विरले असतीन का असे तिला वाटत होते.

समीर आता मित्रासोबत बाहेर आला होता. त्याच्या मनात सायलीबद्दल अनेक विचार फिरत होते.
“समीर अरे कोणत्या विचारात आहेस?” समीरचा मित्र सचिन त्याला म्हणत होता.
“काही नाहीरे सचिन, सायली आज प्रेम म्हणजे काय विचारत होती मला !! पण तिला बोलता बोलता मीच शांत झालो !!”
“काय विचारलं तिने अस??” सचिन समीरला विचारू लागला.
“प्रेम करतोस कोणावर अस विचारत होती मला !!”
“समीर बहुतेक ती तूषारच्या प्रेमात आहे!! मध्ये मी तिला पाहिलं होत त्याच्या सोबत!! नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे समीर !! “

सचिनच्या या बोलण्याने समीर नक्कीच मनात कुठेतरी दुखावला होता. पण का ?? मनात कुठेतरी सायली बद्दल असलेली प्रेमाची भावना समीरला शांत बसू देत न्हवती.

” ती कविता तिच्याकडे पाहूनच सुचली होती ना ?? ” समीर मनातल्या मनात विचारत होता.पण तिचं तर प्रेम नाही आपल्यावर. मग सायली अस का विचारत होती मला? असे कित्येक विचार करत समीर घरी आला. नीट जेवला ही नाही.

सचिन ने सांगितल्या पासून समीरच वागणं सायलीबद्दल पूर्ण बदलून गेलं होत. तो आता तिच्याशी थोड तुटकच बोलू लागला होता. आणि ही गोष्ट सायलीच्या ही लक्षात आली होती. तेव्हा
“समीर अरे कुठे आहेस ??” सायली समीरच्या समोर येत म्हणाली.
“आहे इथेच, कुठे जाणार दुसरीकडे??”
“भेटलाच नाहीस म्हणून विचारलं!! “
“रोज भेटाव अस काही आहे का ??”
“समीर तु असा का बोलतोयस ??”
“मग कस बोलायचं सांग मला !!!”
“काहीं झालंय का ?” सायली समीरकडे पाहत होती.
“काहीं उरलेच नाही आता !!”समीर अगदी रागात म्हणाला.

प्रेम आणि मी !! अस आईला म्हणनारा समीर सायलीच्या प्रेमात पडला होता. वरवर ते त्याला कळत न्हवते. पण त्याची वागणूक आता तेच सांगत होती. सायली पुन्हा पुन्हा त्याला बोलतं होती. पण समीरच्या मनात काही वेगळच चाललं होत. सायली आणि तुषार यांच्यात खरंच काही आहे का ?? सचिन म्हणतोय ते खरं असेन का ?? की सचिन खोट बोलतोय.समीरला यातलं काहीच कळत न्हवत. पण त्याला मनातुन एवढं कळलं होत की सायलीवर त्याच मनापासून प्रेम होत. त्याला तो नाकारू शकत नाही हेही त्याला कळलं होती. थेट सायलीला विचारलं तर आणि अस काही नसेन तर तिचं मन दुखावले जाईन म्हणून सगळं काही समीर मनातच ठेवून होता. पण सचिनला विचारलं तर?? असा मनात विचार येताच समीर त्याला भेटायला निघाला . मनातल्या वादळास कुठेतरी निवारा शोधायला निघाला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *