भाग १
“काकु !! समीर कुठे आहे ?? सायली समीरच्या घरात येत म्हणाली.
“संध्याकाळची वेळ!!! म्हणजे समीर गच्चीवर असणार ना!! समीरची आई सायलीकडे पहात म्हणाली.
सायली काहीच न बोलता थेट गच्चीवर जाऊ लागली. समीर गच्चीवर काहीतरी लिहिण्यात मग्न होता. सुर्यास्त होताना पाहायला त्याला खूप आवडायचं. सायलीला समोर पाहताच त्याने त्याची वही बंद केली.
“काय लिहितोय समीर?? सायलीला अचानक पाहून समीरला काय बोलावं तेच कळेना.
“काही नाही ग जनरल लिहीत होतो!! समीर स्वतःला सावरत म्हणाला.
“प्रेम पत्र लिहितोय की काय कोणाला?? सायली मिश्किल हसत म्हणाली.
“प्रेम पत्र आणि मी ?? शक्य आहे का ते ?? “
“बरं बरं ते जाऊदे !! तु रोज संध्याकाळी काय करतोस पण इथे??”
“तो दुरवराचा सूर्य बुडताना पाहायला खुप आवडत मला !! ” समीर लालबुंद सूर्याकडे पहात म्हणाला.
“रोज??”
“हो रोज !! रोज नवीन वाटतो तो मला !! अगदी मला बोलतो तो सूर्य !! ” समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
“पण ते जाऊदे !! तु इथे काय करतीयेस??”
“अरे!! राहिलच बघ !! अरे मी तुला पुस्तक द्यायला आले होते !! हे घे तुझ पुस्तक!! “
“वाचलं तु पुस्तक हे ??”
“हो वाचलं , किती सुंदर आहे हे पुस्तक !! मला ते तुला द्यायचंय न्हवतच पण म्हटलं तुला हवं असेन म्हणून आले !!”
“तुला आवडल असेन तर राहुदे पुस्तक तुझ्याकडेच, हाकेच्या अंतरावर तर असतेस वाटेनं तेव्हा घेईन मी तुझ्याकडुन!!!”
“खरंच!! “
“हो खरंच राहुदे.!! समीर तिच्याकडे हसत म्हणाला.
सुर्य आता पुर्ण बुडाला होता. अंधाराने स्वतःचा पसारा मांडायला सुरुवात केली होती. त्या सुर्यास्ताकडे पहात समीर अचानक बोलला
“कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे
नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!
कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!”
समीर कविता म्हणत सायली कडे पाहू लागला. कित्येक वेळ सायली फक्त त्याच्याकडे पाहताच होती.
“समीर किती सुंदर आहे !!! कोणी लिहिली आहे रे ??” सायली समीरला विचारू लागली.
“काही माहीत नाही कोणी लिहिली, पण मनातुन भावना बोलल्या एवढंच!”
” बरं चलं मी जाते !! आई वाट पहात असेन माझी!! ” सायली समीर पासून दुर जात म्हणाली.
कित्येक वेळ ते शब्द तिच्या मनात तसेच घोळत होते.
समीर जाणाऱ्या सायलीकडे कित्येक वेळ पहात होता. सुर्यास्त केव्हाच झाला होता. त्या वहीत काहीतरी लिहिलं होत पण काय हे सायलीला का सांगितलं न्हवत . काही कळत न्हवत. सायली समीरच्या शेजारीच राहायला होती. रोज भेटही होत होती कदाचित ती वही सगळं काही लिहून घेत होती.
“समीर , अरे काय त्या वहीत लिहीत असतोस सारखं आम्हाला ही कधी वाचायला दे !!” आई समीर कडे पाहत म्हणाली.
“आई तुला वाचून दाखवणार नाहीतर कोणाला!!! ऐकतेस ??” समीर गच्चीवरून खाली येत म्हणाला.
“हो ऐकते!!” आई समीर समोर येत म्हणाली.
“पाठमोऱ्या तुला जाताना
थांबवावे वाटले मला
पण पुन्हा भेटण्याची ओढ मला
थांबवत होती तेव्हा
त्या वाटेवरून जाताना
पुन्हा वळावे वाटले होते मला
पण पुन्हा नव्या वळणावर
भेटायचे होते तुला
कधी मनातलं सारं
सांगायचं होतं तुला
पण पुन्हा नव्या कविते मध्ये
लिहायचं होत मला …!!”
समीर आईकडे पहात कविता म्हणाला.
“समीर प्रेमात वैगेरे नाहीस ना तु कोणाच्या ??” आई गालातल्या गालात हसत म्हणाली.
“प्रेम आणि मी !! नाही ग आई !! ” समीर घरातुन बाहेर जात म्हणाला.