भाग ३

“सूनंदे , तुझ्या पोराला गप्प कर!! कोणाला माहित कोणाची घाण आहे ते !!! ” सरपंच एकदम बोलून गेला.


“श्याम , तू आजीकडे जाऊन ये !! ” सुनंदा सरपंचाकडे रागाने पहात म्हणाली. तीच्या ओठांवर कित्येक शब्द आले पण ते तिने परतून लावले. या सरपंचाला माझं पोर कोणाची तरी घाण वाटत. पण कित्येक वेळी हा सरपंच इथेच येतो ना घाणीत. मी वाईट मग का येतो इथे हा ! या गोष्टी वाईट वाटतात मग माझ्याकडे आल्यावर याला शांतता का भेटते, पण फक्त स्वतःची शांतता. कधी या नीच माणसाने विचार केलाय माझा किंवा स्वतःचा बायकोचा तरी. नाहीना !! याला फक्त स्वत:ची शांतता हवी आहे. खरंच ही स्वार्थी वृत्ती कधीच कमी होत नाही. म्हणून मला वेश्या , रांड केलं जातं. फक्त आणि फक्त या स्वार्थी आणि नीच माणसांसाठी.


“ये !!! कुठ आहे लक्ष?? ” चला!! ” सरपंच एकदम बोलला.
“हो !! आले !! ” सुनंदा सरपंचाच्या जवळ जात बोलली.
श्याम कित्येक वेळ बाहेरच बसून होता. तो आजीकडे गेलाच नाही. कित्येक वेळा नंतर सूनंदाने दरवाजा उघडला. सरपंच अगदी लपत निघून गेला.
“आई , कोण आहे तो?? मला नेहमी रागवतोच बघ !!! ” श्याम सूनंदाकडे पहात म्हणाला.
“कोणी नाही !! चल तू घरात !! तुला म्हटलं होत ना आजीकडे जा म्हणून!! सुनंदा श्यामचा हात हातात घेत म्हणाली.
“श्याम , अंग गरम लागतंय रे तुझ !! “
“नाही आई , बाहेर झोपलो होतो ना!! त्यामुळे वाटत असेन. ” श्याम आईला समजावत बोलला.
श्यामला ताप आला होता हे सुनंदा ने ओळखले होते. पण एवढ्या रात्री कोण वैद्य भेटेल म्हणुंती सकाळची वाट पाहू लागली. घरगुती काही उपायही केले तिने.


“आई , तू पण झोप ना!! ” श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला.
“नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! ” सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.
“आई , तू एवढी छान आहेस !! मग या लोकांना तू वाईट का वाटतेस ??” श्यामच्या या प्रश्नाने सुनंदा काहीवेळ निशब्द झाली.
“कदाचित त्यांना मी फक्त बाहेरूनच कळले!! मनात कोणी कधी डोकावलच नाही रे !! म्हणून असेन कदाचित!!”
“म्हणजे काय आई ??”
“काही नाही बाळा!! ” झोप तू!!! अस म्हणताच श्याम अलगद डोळे मिटून झोपी गेला.

सुनंदा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दिव्याकडे पहात राहिली. कदाचित तिला श्यामला सांगायचं होत की ” भावनेच्या पलिकडे वासना राहते आणि तिला मन कधी कळलंच नाही. तुझ्या नशिबी ही नरकं यातना देणारी मी, मला वाईट म्हटलं तर काही चुकीचं नाही. माझ्यासारख्या वेश्येच्या उदरात तुझ्या सारखं गोड आणि हुशार पोर देऊन कदाचित त्या विधात्याने तुझ्यावर अन्यायच केला आहे. मी वाईट आहे पण तुझ काय रे !! तुलाही हा समाज रांडेच पोर म्हणूनच हिणावतच ना!! हा दोष फक्त माझा!! त्याचीच शिक्षा कदाचित मी भोगते आहे!! तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होऊ न द्यायची म्हणूनच मला तुला शिकवुन मोठं करायचं आहे. या नरकातून बाहेर काढायचं आहे. असंख्य विचारांचा गोंधळ रात्रभर मनात करत सुनंदा झोपी गेली.


सकाळी तिला जाग आली ती शेजारच्या आजीने दरवाजा वाजवला तेव्हा.
“सुनंदा !! ये सुनंदा!! ” आजी दरवाजा वाजवत बोलली.
“आले !! ” दरवाजा उघडताच आजी आत आली.
“काय ग !! कधी गेला मग तो खवीस!! ” आजी अगदी तिरस्काराने बोलत होती.
“रात्री उशिरा गेले सरपंच !! ते गेले आणि श्यामला पाहिलं. म्हटलं होत त्याला तुझ्याकडे झोपायला जा म्हणून पण नाही, झोपला बाहेरच!! ताप आलीय त्याला!!”
“काय म्हणायंच या पोराला!! मधे पण असाच रात्री आला होता हा तुझ्याकडं माझा डोळा चुकवून!! आई शिवाय क्षणभरपण राहत नाही पोर!! ” आजी श्यामच्या जवळ जात म्हणाली. श्याम अजूनही झोपला होता. डोक्यावर हात ठेवत आजी म्हणाली.
“बाई !! ताप जास्तच वाटतोय ग आता !!! “
“रात्रीपासून आहे !!! ” सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
“शेजारच्या वाडीतल्या वैद्याकडे घेऊन जा बरं पटकन त्याला!! ” आजी काळजीच्या स्वरात म्हणाली.
“हो आता आवरून जाणारच आहे!!”
“तोपर्यंत त्याला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते मी!! “आजी एकदम पुढे सरकत म्हणाली.


सुनंदा सगळं आवरू लागली. आपलं पोर बर होत नाही तोपर्यंत तीच मन कुठेच लागतं नव्हतं.
“ये सुनंदा!!”
“कोण आहे !!”
“मी आहे सरपंच!! “
“सरपंच तुम्ही या वेळी ?? ” माझ्या पोराला बर वाटत नाही सरपंच जाऊ द्या मला!!!” सुनंदा केविलवाणी विनवणी करत सरपंचाला बोलत होती.
“ये , असली नाटक माझ्या समोर नाही करायची !! रांड साली!! मला नाही म्हणती !! ” सुनंदाला कानाखाली मारत सरपंच खोलीत घेऊन गेला. आजी कित्येक वेळ श्याम जवळ बसून त्याची काळजी घेत होती.
“सरपंच , पोराला खूप ताप आलंय मला लवकर जायचं आहे !”
“ये , मरू दे मेल तर ते!! मला उगाच त्रास देऊ नकोस !!! “


कित्येक वेळ गेला, सरपंच आला आणि वासनेच्या जगात बुडून गेला ही. सुनंदा पलंगावर पडून होती डोळ्यात पाणी होते आणि अंगावर कित्येक घाव, तिच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू एकच बोलत होता, ” अरे हा बलात्कार नाही तर काय आहे? पण तुम्हाला, या समाजाला हा बलात्कार वाटणार नाही कारण वेश्येला कुठली आलीय इज्जत ना?? ” तिच्या मनाला काहीच नसेन ना वाटत आता!! शेजारी फेकलेल्या पैश्याना हातही लावू वाटत नसेन या घुसमटलेल्या जीवना पुढे. अरे हो असे बलात्कार काय होतच असतील ना !! त्यात नवल काय ते!!! कारण इथे फक्त वासना नांदते!!


“सुनंदा !! ये पोरी !! चल लवकर!! श्यामकडे चल पटकन!! ” आजी एकदम ओरडतच आली.
आजीच्या बोललण्याने सुनंदा एकदम भानावर आली . अंगावरचे कपडे नीट करत ती श्यांमकडे गेली.


“श्याम !! काय झाल बाळ !! उठ ना!! उठ ना रे बाळा!!! “

क्रमशः

✍योगेश खजानदार

READ MORE

मनातलं प्रेम

“अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!” त्याने रिप्लाय केला, “मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही र…
Read More

भेट

” आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न …
Read More

लक्ष्मी

“कोण आहे?” “दादा मीच आहे!!” “का रे सदा? काय काम काढलं सकाळ सकाळ?” “पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्…
Read More

काॅफी

काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी …
Read More

शब्द की भावना

पुन्हा जगावे ते क्षण तुझ्या सवे आज सखे तु समोर असताना व्यक्त व्हावे मन जसे ती सांज तो वारा पुन्हा त…
Read More

सांजभेट

मज वाट एक अधुरी दिसते तुझी साथ हवी होती त्या वळणावरती एकदा तुज पहायची ओढ होती मनात तुझ्या एक सल मला…
Read More

दोन श्वास

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल …
Read More

विरहं… !!

कुठेतरी आजही तुझी आठवण कायम आहे त्या चांदण्या मध्ये मी तुला का उगाच शोधते आहे अश्रुचा हा सागर जण…
Read More

अधुरी प्रित.. 

तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गे…
Read More

अंतर

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच र…
Read More

अंतर (भाग -२)

“माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या …
Read More

अंतर (भाग-३)

सखे असे हे वेड मन का सैरावैरा फिरते तुझ्याचसाठी तुलाच पाहण्या अधीर होऊन बसते कधी मनाच्या फांदि…
Read More

अंतर(कथा भाग ४)

“तुझ्या आवडती coffee!!!” प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली. “थॅन्क्स!!” योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. …
Read More

अंतर…!!(कथा भाग -५)

ओढ मनाची या खूप काही बोलते कधी डोळ्यातून दिसते तर कधी शब्दातून बोलते वाट पाहून त्या क्षणाची खूप…
Read More

दुर्बीण( कथा भाग १)

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घ…
Read More

दुर्बीण कथा भाग २

दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात. “काय रे…
Read More

दुर्बीण कथा भाग ३

सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा…
Read More

दुर्बीण .. एक कथा..

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घ…
Read More

सुर्यास्त (कथा भाग -१)

पाठमोऱ्या तुला जाताना थांबवावे वाटले मला पण पुन्हा भेटण्याची ओढ मला थांबवत होती तेव्हा त्या वाटे…
Read More

सुर्यास्त (कथा भाग -२)

सायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच ह…
Read More

सुर्यास्त (कथा भाग -४)

तुझ्या असण्याची जाणीव मला ही हळुवार झुळूक का द्यावी तू दूर त्या किनारी तरी माझ्या जवळ का भासावी …
Read More

सुनंदा (कथा भाग १)

या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंध राहाय…
Read More

सुनंदा..!!(कथा भाग २)

थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा म…
Read More

सुनंदा ..!!(कथा भाग ३)

आई , तू पण झोप ना!! ” श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला. “नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच…
Read More

सुनंदा…!!( कथा भाग ४)

ये आजे , श्याम उठतं का नाहीये !! ” सुनंदा आजीकडे पहात म्हणाली. “बाळा मी आले रे !! तुझी आई !! उठ ना …
Read More

सुनंदा…!!(अंतिम भाग)

“सोड !! सोड रे!! अरे राक्षस आहे का कोण आहेस तू!!! ” सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली. “अरे भाड्य…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा