भाग २

“पण आई त्या दुसऱ्या जगात आहे तरी काय अस?? ” श्याम सूनंदाचा हात हातात घेत म्हणाला.
सुनंदा कित्येक वेळ फक्त श्यामकडे पहातच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना. काय आहे तिथे ?? खरंच मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो,पण सुनंदा काहीच बोलली नाही, श्याम शाळेत जायला निघाला. सगळं आवरून तो चालत चालत शाळेच्या जवळही आला.


“काय श्याम रातीला कोण होत घरी ??” गावाची टवाळ पोर श्यामकडे बघून जोरात हसू लागली. पण श्याम सात वर्षाच पोर ते त्याला काहीच कळलं नाही. तो न बोलता पुढे निघून गेला. त्याच्या वर्गातली पोर मैदानावर खेळतं होती. ते पाहून श्यामही त्याच्या सोबत खेळायच म्हणून गेला.
“मी पण खेळू !!! ” श्याम मित्राला विचारत म्हणाला.
“नको रे बाबा !! तुझ्या सोबत खेळताना बघितल तर बाप मारल मला !! ” वर्गातला एक मुलगा श्यामला म्हणाला.
“का पण !!!”
“तू म्हण रांडेचा पोरगा आहेस म्हणून !!!”
“म्हणजे काय ???” श्यामला काहीच कळलं नाही.
“मला पण नाही माहिती!! पण बाप म्हणत होता मला!!” जा बाबा इथून तू आता!!” तो वर्गमित्र त्याला अगदी हाकलून दिल्या सारखं बोलला.


श्याम कित्येक वेळ एकटाच बसून त्या मैदानावर त्याचाकडे पहात बसला. नक्की आपलं काहीतरी चुकतंय याच त्याला राहून राहून वाटत होत. पण काय ? रांडेचं पोर म्हणजे तरी नक्की काय. माझी आई माझ्यावर किती प्रेम करते. तिचा मी मुलगा आहे याच तर मला कौतुक वाटतं ना. खरंच ही दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप!!! श्याम कित्येक विचाराणं मधे बुडाला. दिवसभर त्याच लक्ष शाळेत कुठे लागलच नाही. शाळेची वेळ बघता बघता निघूनही गेली. श्याम घरी जायल निघाला. घरी पोहचताच त्याने आईला विचारलं.
“आई , मला तुला काही विचारायचं आहे ??”
“काय रे श्याम , आताच तर शाळेतून आलास जा जरा हात पाय धुऊन ये!! ” श्याम बाथरूम मधे जाऊन हात पाय धुऊन आला. पण त्याने पुन्हा विचारलं.
“आई , विचारू का ??”
“बरं , विचार श्याम !! “
“आई , रांडेच पोर म्हणजे काय ग ??” श्याम ने अस विचारताच सुनंदला काय बोलावं तेच कळेना.
“श्याम , काय बोलतोय तू हे !! जा जाऊन अभ्यास कर.”
“सांग ना आई , मला शाळेत सगळे रांडेचं पोर का म्हणत असतात?”
“श्याम, कोणी काहीही म्हटलं तरी आपण त्याकडे लक्ष नाही द्यायचं !! “अस म्हणून सुनंदा घरात निघून गेली.


सुनंदा कित्येक वेळ डोळ्यातील टिपूस गाळत घरातच बसून होती. मनात असंख्य विचार करत होती ” हा समाज मला नाव ठेवतो. पण याच समाजाने मला इथे आणून ठेवलं हे कोण का सांगत नाही. थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा मुलगा शिकून मोठा व्हावा अस मला वाटत तर यात माझं काय चुकलं? का माझ्या मुलानेही इथेच चोऱ्या माऱ्या करून आयुष्य तुरुंगात घालायचं! मला वेश्या करणारा हा समाज पहिले स्वतःचा आंधळ्या वासना का पहात नाही. मला सुधारायचा म्हटलं तरी हा समाज मला जवळ करत नाही. प्रत्येक वेळी जिथे जावं तिथे वासनेने अंध झालेली कुत्री फिरत असतात. मग मी लाज का बाळगावी. दहावीत उत्तम गुण मिळाल्यावर मी नाचत घरी आले होते, तेव्हा माझ्या बापाने माझा हिशोब केला होता घरी. ओढत घेऊन जाताना कुठे गेला होता हा समाज. ?? “
“सुनंदे !!! ” वस्तीतली आजी सुनंदाला हाक मारत घरात येत होती. सुनंदा डोळे पुसत स्वतःला सभाळून घेत होती.
“काय झाल ग !! रडतेस का ??” आजी सुनंदाची विचारपूस करू लागली.
“काही नाही!! नेहमीच दुसर काय !!! “
“कोण काय म्हणालं!!” आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली.
“श्यामला आज कोणीतरी शाळेत रांडेचा म्हणाला !! तर श्याम अर्थ विचारत होता मला!! “
“बाई ग !! एवढं मनाला नाही लावून घ्यायचं!! हे का नवीन आहे आपल्याला!! तू बाकी मनानं खूप हळवी आहेस बघ !! सुनंदा या जगात आणि त्या जगात खूप अंतर आहे बघ !! एकदा का इकडे आल की सुटका नाही!! आणि ते जग काय म्हणत याचीही परवा करायची नाही!!” आजी अगदी मनातल बोलू लागली.


“मलाही खूप मोह होता ग !! या दुनियेतील आपला प्रवास संपवून त्या दुनियेत जाण्याचा!! पण सारी गिधाड टपून बसतात आपला फडशा पाडायला. “आजी सुनंदा कडे सगळं काही बोलू लागली.
“म्हणून , हे असलं जीवन जगायचं???” सुनंदा भरल्या आवाजाने म्हणाली.
“हे आपलं जीवन आहे पोरी!! आपलं काम फक्त वासना पूर्ण करण्यासाठी !! पण आपण माणुसही आहोत हे मान्य कोणी करणार नाही. आपाल्या मनात असंख्य भावना आहेत हे कोणी मान्य करणार नाही. आपण फक्त याच्या उपभोगाची वस्तू !! आजी पदराने डोळे पुसत म्हणाली.
“ये सुनंदा!!! दार उघडं !!! ” बाहेरून कोणी इसम मोठ्याने ओरडून बोलू लागला.
“कोण आहे !!! ” सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
“सरपंच तुम्ही !!! आणि यावेळी ?? “
“आता काय तुला विचारून येत जाऊ का मी ??” सरपंच दारूच्या नशेत सुनंदा वर खेकसला.
” नाही , तसं नाही !! पण लवकर आलात म्हणून विचारलं!!! “
“बरं चल!! बसं कर बोलणं !! ये म्हातारे निघ चल आता !!! मला निवांत पडायचं आहे इथे!! ” सरपंचाच्या या बोलण्याने आजी बाहेर निघून गेली.
“आई, दरवाजा का बंद केला ??” श्याम बाहेरून हाक मारत आईला बोलू लागला.

क्रमशः

✍ योगेश खजानदार

READ MORE

मनातलं प्रेम

“अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!” त्याने रिप्लाय केला, “मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही र…
Read More

भेट

” आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न …
Read More

लक्ष्मी

“कोण आहे?” “दादा मीच आहे!!” “का रे सदा? काय काम काढलं सकाळ सकाळ?” “पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्…
Read More

काॅफी

काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी …
Read More

शब्द की भावना

पुन्हा जगावे ते क्षण तुझ्या सवे आज सखे तु समोर असताना व्यक्त व्हावे मन जसे ती सांज तो वारा पुन्हा त…
Read More

सांजभेट

मज वाट एक अधुरी दिसते तुझी साथ हवी होती त्या वळणावरती एकदा तुज पहायची ओढ होती मनात तुझ्या एक सल मला…
Read More

दोन श्वास

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल …
Read More

विरहं… !!

कुठेतरी आजही तुझी आठवण कायम आहे त्या चांदण्या मध्ये मी तुला का उगाच शोधते आहे अश्रुचा हा सागर जण…
Read More

अधुरी प्रित.. 

तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गे…
Read More

अंतर

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच र…
Read More

अंतर (भाग -२)

“माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या …
Read More

अंतर (भाग-३)

सखे असे हे वेड मन का सैरावैरा फिरते तुझ्याचसाठी तुलाच पाहण्या अधीर होऊन बसते कधी मनाच्या फांदि…
Read More

अंतर(कथा भाग ४)

“तुझ्या आवडती coffee!!!” प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली. “थॅन्क्स!!” योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. …
Read More

अंतर…!!(कथा भाग -५)

ओढ मनाची या खूप काही बोलते कधी डोळ्यातून दिसते तर कधी शब्दातून बोलते वाट पाहून त्या क्षणाची खूप…
Read More

दुर्बीण( कथा भाग १)

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घ…
Read More

दुर्बीण कथा भाग २

दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात. “काय रे…
Read More

दुर्बीण कथा भाग ३

सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा…
Read More

दुर्बीण .. एक कथा..

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घ…
Read More

सुर्यास्त (कथा भाग -१)

पाठमोऱ्या तुला जाताना थांबवावे वाटले मला पण पुन्हा भेटण्याची ओढ मला थांबवत होती तेव्हा त्या वाटे…
Read More

सुर्यास्त (कथा भाग -२)

सायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच ह…
Read More

सुर्यास्त (कथा भाग -४)

तुझ्या असण्याची जाणीव मला ही हळुवार झुळूक का द्यावी तू दूर त्या किनारी तरी माझ्या जवळ का भासावी …
Read More

सुनंदा (कथा भाग १)

या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंध राहाय…
Read More

सुनंदा..!!(कथा भाग २)

थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा म…
Read More

सुनंदा ..!!(कथा भाग ३)

आई , तू पण झोप ना!! ” श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला. “नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच…
Read More

सुनंदा…!!( कथा भाग ४)

ये आजे , श्याम उठतं का नाहीये !! ” सुनंदा आजीकडे पहात म्हणाली. “बाळा मी आले रे !! तुझी आई !! उठ ना …
Read More

सुनंदा…!!(अंतिम भाग)

“सोड !! सोड रे!! अरे राक्षस आहे का कोण आहेस तू!!! ” सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली. “अरे भाड्य…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा