भाग १

टीप : ही कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी तो आढळून आल्यास निवळ योगायोग समजावा.या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंध राहायचं आहे. इथे लज्जा माझ्यासाठी फक्त शब्द आहे पण तरीही समाजानं सोडून दिलेली लाज हळूच लपवायची आहे. या शिकलेल्या आणि इज्जतदार लोकांना आपल्या वासना आणि इच्छा माझ्या इथे पूर्ण करायच्या आहेत. हो मी समाजानं बाजूला केलेली पण त्याच्या उपयोगाची वेश्या आहे! हो मी फक्त उपयोगाची . माझं नाव सुनंदा ! मला माझी कथा सांगायची आहे.पण सुरुवात कुठून करावी हाच मुळी प्रश्न आहे ,शेवट मात्र माझा वाईटच. मनाच्या कोपऱ्यात एक स्त्री आज बोलते आहे. माझी कथा ती सांगते आहे. मनात खूप काही राहील की ते आपोआप ओठांवर येतं तसच माझं झालेलं आहे.

छोट्या खेड्यात राहणारी मी, गावाच्या वेशी बाहेर आमची वस्ती. रात्र झाली की आमच्या वस्तीकडे येणारे खूप लोक असतात. अगदी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ही येतात. पण तरीही आमच्याकडे अगदी तुच्छतेने पाहिलं जात. माझा मुलगा सात वर्षाचा. त्याला कधी या लोकांचं वागणं कळलच नाही. कारण त्याने जग अजुन जवळून पाहिलच नाही. तुम्ही म्हणाल वेश्येला मुलगा?? पण हे खरं आहे! मला मुलगा आहे. त्याची आई म्हणून मी सर्व कर्तव्य करते.पण कधी कधी मला त्याची आई असल्याची लाज वाटते.

“ये सूनंदे !! उठ पटकन!! तुझा नेहमीच माणूस आलाय बाहेर!! ” सुनंदा वहीची पानं मिटत उठली आणि बाहेर गेली.
“शेठजी तुम्ही !! या ना !! ” शेठजी डोक्यावरची टोपी सांभाळत अगदी चोर पावलाने आता गेला.
“सुनंदे , आज रात्र इथेच राहणार आहे मी. तुझ्या सोबत असल की मला बर वाटत बघ, बायको नुसती डोक्याला ताप करती!!”दारू पिऊन गावचा सरपंच सुनंदाकडे रात्री झोपायला आला होता.
“राहा ना सरपंच !! पण पोराला जरा बाहेर झोपवून येते!! “अस म्हणून सुनंदा आपल्या पोराला बाहेर झोपवण्यास आली. श्याम ,सूनंदाच पोर ते आई जवळ झोपायचा हट्ट करत होते. पण सुनंदा त्याला वस्तीतल्या मोठ्या आजीकडे झोपवून आली.

“सुनंदे !!” सरपंच सूनंदला हाक मारत होते. हा सरपंच सूनंदकडे मनातल अगदी मनमोकळे पणाने सगळं सांगणार.
“सुनंदा !! तुझ्याकडे एक जादू आहे बघ !! मला तुझ्याकडे आल की बर वाटतं! ती माझी कजाग बायको माझा नुसतं छळ करते. पण आमच्या शेजारची ती चंदा , मस्तच आहे. वाटत कधी कधी की तीच माझी बायको असती तर किती बर झालं असतं!! ” सरपंच सुनंदाकडे पाहत बोलत होता.
“पण सरपंच ती तुमची लग्नाची बायको !! तिच्या बद्दल अस बोलण चागलं नाही!!” सुनंदाचां जीव आपल्या पोरासाठी तळमत होता. पोर रात्रभर रडेन पण माझ्याशिवाय झोपणार नाही हे तिला माहीत होत.

“कसली लग्नाची बायको!! कधी प्रेम करायचं माहिती का तिला!! तिच्या असल्या वागण्यानं तर मी इथ आलोय!! ” सरपंच अगदी जोरात बोलत होता.
सरपंचाच्या या बोलण्याने सुनंदाच्या मनात विचारांचा गोंधळ झाला.” वासना माणसाला नात्यातील गोडवा ही विसरायला भाग पडते ना!! अस तिला वाटू लागलं. या नष्ट होणाऱ्या शरीराच्या तात्पुरत्या गरजा, तरीही सर्वांना या हव्याच ना. भावनेच्या पलिकडे जाऊन याचा प्रभाव जास्तच असतो मनातल्या विचारांना बंद पाडते आणि उरतो फक्त सुखासाठी केलेला तो प्रयत्न. कशासाठी हा हट्ट तर फक्त वासना पूर्ण करण्यासाठी.”

“आई !!!” विचारांच्या तंद्रीत असलेली सुनंदा अचानक भानावर आली. दरवाजा उघडताच बाहेर श्याम तिला मिठी मारू लागला. तो त्या आजीच्या घरातून निघून आला होता.
“आई !! मला तुझ्या जवळ झोपायच आहे.” श्याम आत मधे पहात म्हणाला.
“ये सुनंदा !! कोण आहे बाहेर!! आजुन गिऱ्हाईक आल असल तर निघून जा म्हणाव!! ” सरपंच पलंगावर पडून म्हणाला.
“नाही सरपंच !! मुलगा आहे माझा!! ” सुनंदा आत बघत म्हणाली.
“पोरगा आन तुझा !!” सरपंच बाहेर बघत म्हणाला.
“होय , माझ्या जवळ झोपायच म्हणून हट्ट करतोय!!”
“ये भाडकाव !! जाऊन निज की गप्प!! जरा शांततेसाठी आलो तर याची कटकट !! ” सरपंच पोराला धक्का मारत आत निघून गेला. सुनंदाच्या डोळ्यात राग होता पण तिला काहीच करता येत न्हवत. ती शांतपणे श्यामला समजावून सांगत होती. अखेर ते पोर तसच रडत तिथेच झोपी गेले
श्याम तसाच दरवाजाच्या बाहेर झोपी गेला पण नाईलाजाने सूनंदाला आता जावं लागलं, ती रात्र सुनंदाला कधीही विसरता येत नाही अशी होती. आपल्या पोटचा गोळा बाहेर तसाच झोपी गेला होता आणि आपण आत असूनही काही करू शकत नव्हतो याच दुःख तिला होत.

पहाट होताच सरपंच चोर पावलांनी बाहेर निघून गेला. अगदी सुनंदाला कधी भेटलोच नाही या आविर्भावात तो निघून गेला. रात्रभर श्याम बाहेरच झोपला होता. सुनंदा पटकन बाहेर गेली आणि आपल्या पोराचे कित्येक मुके घेत ती त्याची माफी मागू लागली. “बाळा माझं चुकल रे !!” मला माफ कर!!” श्याम आईला घट्ट मिठी मारत होता.

सकाळ होताच सुनंदा श्यामला शाळेत जाण्यासाठी आवरू लागली. पण श्याम काही केल्या जायला तयारच नव्हता.
“पोरा शिकून मोठा झालास तर या नरकातून बाहेर पडशील तू!” सुनंदा श्यामकडे पाहत म्हणाली.

आणखी वाचा:  विरोध .. (कथा भाग ३) || MARATHI LOVE STORY ||

क्रमशः

सुनंदा (अंतिम भाग) सुनंदा (कथा भाग २)

✍योगेश खजानदार

Share This: