भाग ५
“आजे , उठवण श्यामला!! ” सुनंदा अगदी केविलवाणा चेहरा करून आजीकडे पाहू लागली.
आजी श्यामला आपल्या जवळ घेत पाहू लागली. तिच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला.
“बाळा , अस नाही करायचं बर!! हे असं !!! ” आजी हुंदके देत बोलू लागली. तिच्या मनाला कित्येक गोष्टी कळून चूकल्या होत्या.
“आजे , रडायला काय झाल ..!! माझा श्याम उठतं का नाहीये !!! ” सुनंदा अगदी मोठ्याने बोलत होती.
“सुनंदा , सावर बाई स्वतःला!!! श्याम गेलाय !!! ” आजी तिला जवळ घेत बोलत होती.
“काहीही काय म्हणतेस आजे!!! माझा श्याम असा जाणार नाही !!! नाही !!! ” सुनंदा श्यामला जवळ घेत म्हणाली.
“सुनंदा, सावर स्वतःला!!! ” अस म्हणताच सुनंदा कित्येक मोठ्याने आक्रोश करत आजीकडे पाहू लागली.
“माझा श्याम !!! माझा गुणी श्याम !!! गेला ?? नाही आजे गेला नाहीये तो !!! बघ एकदा त्याला बोल म्हणाव मला !!! आईची कसली रे लावली ही चेष्टा !!! ये श्याम !!! श्याम!!!! उठ रे बाळा!! आता तुला माझी शप्पथ आहे बर !! ” सुनंदा कित्येक अश्रू पुसत बोलत होती. सुनंदाच्या आवाजाने वस्तीतील लोकांनी गर्दी केली.
काही केल्या सुनंदा श्यामला सोडायला तयार नव्हती. कित्येक प्रयत्ना नंतर श्यामच्या त्या देहाला स्मशानात आणलं होत. सुनंदा आता एक शब्दही बोलत नव्हती. ती फक्त पहात होती. सरणावर ठेवलेल्या आपल्या मुलाचा चेहरा शेवटचा पहात होती. हळू हळू ते पेट घेत श्यामला आपल्यात सामावून घेत होते. हो ती चिता रचली होती.
“या दोन्ही जगात तुला कधीच सुख मिळालं नाहीच ना रे!! इकडे तुला माझ्या पासून दूर केलं!! आणि त्या समाजाने नेहमीच रांडेच पोर म्हणून हिणवलं!! पोरा पण का सोडून गेलास मला ?? माझ्यासाठी तरी !! पण त्या देवाला कदाचित तुझ्यासारख गोड पोर पाहिजे होत म्हणून ते त्याने बोलावून घेतल, तू रांड आहेस, तू वेश्या आहेस तुझी तेवढी लायकी नाहीये हे गोड पोर सांभाळायची म्हणून कदाचित तुला त्याने बोलावून घेतलं!! हो बाळा सुटलास तू !! माझ्या सारख्या बाईला पण प्रेम करायचं शिकवून गेला तू!! माय काय असते हे सांगून गेलास तू !!! श्याम !!! ” सुनंदा पेटत्या ज्वालाकडे शांत पहात विचार करत होती.
“सूनंदे , चल पोरी घरी !!! “आजी सूनंदेला उठवू लागली. स्मशानात फक्त त्या दोघीच राहिल्या होत्या. बाकी लोक केव्हाच निघून गेले. विसुरू गेले.
“आजे !! बघणं !! होत्याचं नव्हतं झालं !! कालपर्यंत आई आई करणार पोर !! आईला न बोलताच दूरच्या प्रवासाला निघून पण गेलं!! ” सुनंदा भरल्या डोळ्यांनी बोलत होती.
“असच असतं पोरी!! जीव लावणारी माणसं लवकर दुरावतात!! “
“आणि आयुष्याची आठवण ठेवून जातात!! ” सुनंदा शांत बोलत होती.
सुनंदा घरी येताच कित्येक वेळ एकटीच त्या खोलीत बसून रडत होती. ज्या श्यामसाठी जगायचं तोच निघून गेला मला सोडून, मग आता जगायचं तरी कोणासाठी. अस म्हणत कित्येक वेळ ती बसून होती. श्यामच्या कित्येक वस्तू तिला त्याची आठवण करून देत होते.” श्याम !! माझं पोर श्याम!! त्या सरपंचाच्या डोळ्यात सलनारा श्याम!!! त्या शाळेतल्या पोराला रांडेच पोर वाटणारा श्याम !! सतत आई आई करणारा माझा श्याम !! आई तू पण झोप ना म्हणत माझी काळजी करणारा श्याम !! ” सुनंदा श्यामच्या आठवणीत पुरती बुडाली होती.
“ये सुनंदे !! ” बाहेरून दरवाजा जोरात वाजत होता.
“कोण आहे !! ” सुनंदा स्वतः ला सावरत म्हणाली.
“मी आहे सरपंच !! दरवाजा उघड !! ” सरपंच जोरात ओरडला.
“सरपंच तुम्ही जावा इथून !! ” सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
“काय ग ये रांडचे !! मला काय जा म्हणती तू?? कोण जास्त पैसे देणार भेटलं का काय तुला?? ” सरपंच सुनंदा वर हात उगरात बोलला.
“सरपंच माझं पोर आताच गेलं!! आणि आता तुम्ही कधीच नाही आलात तर चाललं मला!! “
“चला घाण गेली एकदाची !! पोर लैच त्रास देत होतं !!”
“सरपंच !!!” अस म्हणत त्याच्या कानाखाली मारत सुनंदा त्याच्याकडे कित्येक वेळ पहात होती. सरपंचाला हे अनपेक्षित होत.
“साली रांड !! आली ना लाईकी वर !! चल आत !! खूप झाली तुझी नाटक !! साली छिनाल !!! ” सरपंच सूनंदाला खेचत खोलीत घेऊन जाऊ लागला.
“सोड !! सोड रे!! अरे राक्षस आहे का कोण आहेस तू!!! ” सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली.
“अरे भाड्या जरा तरी दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की!! वासनेची भूक एवढी कसली रे तुला!!! जा एकदा स्मशानात जाऊन बघ !! तिथं प्रेम ,वासना , राग , तिरस्कार सगळं काही राख झालंय !!”
“जास्त बोलू नको सुनंदे !! गप्प चल आत!! आणि कित्येक लोकासोबत झोपणारी तू !! तुला कसली आलीय प्रेम आणि माया !! ” सरपंच पुन्हा तिला खेचू लागला.
“यावेळी नाही !! नाहीच !!” सुनंदा हात सोडवत घरातून बाहेर पळाली.
“सुनंदा !! ” पळत जाणाऱ्या सुनंदाकडे पाहत आजी हाक मारू लागली.
सरपंच हळूच निघून गेला. सुनंदा कुठे आहे हे त्याने पाहीलही नाही. पण आजी थकत थकत सूनंदाच्या मागे मागे जाऊ लागली.
“सुनंदा!! ” आजीचा आवाज सुनंदा पर्यंत पोहोचलाच नाही.
ती फक्त पळत होती. हो या दुनियेपासून , ती फक्त पळत होती. तिला भान नाहीं राहिले स्वतःचे , स्वतःचे अस्तित्व विसरून ती पळू लागली. कित्येक वेळ. त्या वस्तीपासून दुर लांब कुठेतरी !! पण कुठे हे माहीतच नव्हते.
“आई , ती दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप !! ” श्यामचं हे बोलणं तिला अचानक आठवल. मग मी जाऊ कुठे बाळा ??” सूनंदाच्या मनाने हा प्रश्न केला.
“आई !!! इथे ना मला खूप बरं वाटतंय !! आणि कोणी काही बोलत पण नाहीये !! कोणी उठवत पण नाहीये !! कोणी हाकलून पण देत नाहीये !! ” सुनंदा पळत पळत स्मशानभूमीत आली होती. ती राख कदाचित तिला बोलत होती.
“आई , आता ही राख पाहून कोणी ओळखणार पण नाही मला !! की मी रांडेच पोर आहे म्हणून!! ” आई तू नकोस उगाच पळू!! कारण ते जग खूप वाईट आहे, तुला ते कसही धरनारच !!! ” सुनंदा फक्त पहात होती.
“काय करू मी पोरा !! तुझ्याशिवाय मला एक क्षणही राहवत नाही!! ” कस जगू मी !!! “सुनंदा त्या राखेकडे पहात बोलत होती.
बोलता बोलता ती अचानक गप्प झाली, चालत चालत बाहेरच्या नदीजवळ आली. आपल्या आयुष्याची ही कथा इथेच संपवायची या निर्धाराने ती चालू लागली. कदाचित नदीला आपलस करायला निघाली.
कित्येक वेळा नंतर आजी तिथे पोहचली. सूनंदाच्या प्रेताकडे पहात बोलू लागली.
“ये सुनंदे !!! ” उठ की ग !!” आजी रडत बोलत होती.
गर्दीतल्या प्रत्येकाला हात जोडून विनंती करत होती. मदतीसाठी!!
“कोण हो ही ? ” गर्दीतला एक माणूस दुसऱ्या माणसास बोलत होता.
“रांड साली !!! ” वरच्या वस्तीतली !! मेली बघा !!! “
” हो !!! रांड साली !!! कित्येक वेळा वासनेच्या तुझ्या सारख्या कुत्र्याला सांभाळणारी मी सुनंदा रांड !! अरे रांड मी नाही रांड तुझी वासना आहे !!! जिला ना भावना कळतात , ना प्रेम !! फक्त हवी आहे मी एक रांड म्हणुन!! उपभोगायला फक्त !!! ” कदाचित ते सूनंदाचे प्रेत असेच काही सांगत होते .
अखेर त्या वस्तीतल्या घरात वासना आणि प्रेम या दोघांचाही अंत झाला होता, ना वासना जिंकली ना प्रेम, उरल्या होत्या भिंती काही आठवणीच्या साक्षी देत , स्वतःशीच बोलत.
“बाळा शिकून मोठा झालास ना की तू या नरकातून बाहेर पडशील!!!”
“पण आई !! ते जग खूप वाईट आहे !!!! “