"चुकलेले मत, हताश बळ, लाचार जीवन, पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता, तिरस्कार असता, मनातील भावना, प्रेम दिसत नाही!! नजरेने बघत, आपलेच लोक, वाईट चिंतन, प्रगती होत नाही!! माझेच सर्व, माझेच मीपण, गर्व हा कसला, मीपण सुटत नाही!! सांगने हेच एवढे, हे सर्व असता, जीवन हे चालता, सुख मिळत नाही!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
