"सावरून घेता मी स्वतः, तु नकळत समोर यावे !!
स्पर्श तो अलगद असा, की मी पुन्हा हरवून जावे !!

सांगते का ते मना, सर्व बंध तोडून द्यावे!!
एक मी आणि एक तू, फक्त नाते हे उरावे !!

क्षण वाटे तो रेंगाळला , मिठीत जेव्हा तुझ्या रहावे !!
नकोच कोणती गोष्ट ती, ज्यात तू नी मी नसावे !!

बहरून जणू रात्र यावी, चांदण्यात त्या मी फिरावे !!
अलगद मग चंद्रासही , तुझ्या प्रेमाचे रंग द्यावे !!

का असे हे मन पुन्हा, नजरेतूनी त्या आज बोलावे !!
तुझ्या सोबतीचे चित्र जणू,  मनात या माझ्या भरावे !! 

नको दुरावा या पुढे , ना कोणते बहाणे असावे !!
मी तुला आठवावे, नी तू माझ्या सोबत असावे !!

सावरून घेता मी स्वतः, तू नकळत समोर यावे !!"

✍️ © योगेश खजानदार
SHARE