साद || SAAD || RAIN POEM ||

Share This
 "सुगंध मातीचा
पुन्हा दरवळु दे!!
पड रे पावसा
ही माती भिजु दे!!

 शेत सुकली पिक करपली
शेतकरी हताश रे!!
नकोस करु थट्टा
जीव माझा तुझ्यात रे!!

 वाट पाहुनी तुझी
माती ही रडतेय रे!!
तुझ्या विरहात
रोज ती मरतेय रे!!

 आता येशील तिला भेटशील
पिकं ही सुखाव रे!!
ऐकणारे पावसा
आता तरी पड रे!!"

 -योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

मैत्री || FRIENDSHIP || MARATHI POEM ||

Tue Aug 11 , 2015
तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न सोडणारी