"एक तु आणि एक मी
 सोबतीस एक सांज ती!!
 विखुरली ती सावली
 कवेत घ्यायला रात्र ही!!

 अबोल तु निशब्द मी
 बोलते एक वाट ती!!
 सोबतीस आज ही
 मागते एक साथ ती!!

 जाण तु अजाण मी
 झुळुक एक स्पर्श ती!!
 सांगते का आज ही
 मनातली एक गोष्ट ती!!

 प्रेम तु एक भाव मी
 सुंदर एक क्षण ही!!
 मन बोलते आज ही
 चांदण्यातील एक ती!!

 समीप तु की विरह मी
 भेटण्याची आस ती
 विखुरली का सावली
 कवेत घ्यायला रात्र ही!!"
 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE