सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी 
 मला हरवून जाते!!
 मावळतीच्या सुर्यासवे 
 एक गीत गाते!!

 त्या परतीच्या पाखरांची
 जणू ओढ पहाते!!
 ती झुळूक उगा सांजवेळी
 गंध पसरवून जाते!!

 कधी नभी ,कधी लाटांवर
 मनसोक्त फिरते!!
 जाता जाता क्षणभर थांबून
 आठवांचा पाऊस देते!!

 थेंब होऊन पानावरती
 दवबिंदू होऊन जाते!!
 ती झुळूक उगा सांजवेळी
 आपल्यास जाऊन भेटते!!

 आज इथे , उद्या तिथे 
 क्षणभर न थांबते!!
 कोण इथे , कोण तिथे
 मनातलं गुपित ओळखते!!

 अबोल राहिले मी तरी
 सगळं काही ऐकते!!
 ती झुळूक उगा सांजवेळी
 सोबतीस माझ्या येते..!

 ✍️© योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

"हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओळखीची ती…

बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

"कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार नाही!! तुझ्याच…

हळुवार क्षणात || HALUWAR KSHANAT ||

अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत !!…

मन || MANN MARATHI AATHVAN KAVITA ||

माझ्या मनाच्या तिथे एक तुझी आठवण सखे गोड आहे कधी अल्लड एक हसू तुझे कधी उगाच रागावणे आहे

हो ना || HO NA || MARATHI LOVE POEMS ||

"गोष्ट फक्त एवढीच होती मला समजून सांगायचे होते आणि तुला समजून घ्यायचे न्हवते

मनाचा गुंता || MANACHA GUNTA ||

गुंतण म्हणजे काय असतं स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं कोणाच्या प्रेमात पडायचं असतं…

मनातली कविता || MANATLI KAVITA || VIRAH ||

एक आर्त हाक मनाची पुन्हा तुला बोलण्याची तुझ्यासवे सखे मनातील खुप काही ऐकण्याची तुझ्याचसाठी पावसाची ढगाळल्या नभाची तु नसताना समोर…

मनातली सखी || MANATLI SAKHI || LOVE ||

कधी कधी मनातली सखी खुपच भाव खाते पाहुनही मला न पहाता माझ्या नजरेत ती रहाते चांदण्याशी बोलताना मात्र खुप काही…

मनास या || MANAS YA || LOVE POEM MARATHI ||

वादळास विचारावा मार्ग कोणता रात्रीस विचारावा चेहरा कोणता लाटेस विचारावा किनारा कोणता की मनास या विचारावा ठाव कोणता उजेडास असेल…

Next Post

ब्लॉगला Subscribe नक्की करा .. आपला Mail Id 👇 येथे समाविष्ट करा ..

Tue Aug 6 , 2019
ब्लॉगला Subscribe नक्की करा .. आपला Mail Id 👇 येथे समाविष्ट करा ..