ती झुळूक उगा सांजवेळी, मला हरवून जाते!! मावळतीच्या सुर्यासवे, एक गीत गाते!! त्या परतीच्या पाखरांची, जणू ओढ पहाते!! ती झुळूक उगा सांजवेळी, गंध पसरवून जाते!! कधी नभी ,कधी लाटांवर, मनसोक्त फिरते!! जाता जाता क्षणभर थांबून, आठवांचा पाऊस देते!! थेंब होऊन पानावरती, दवबिंदू होऊन जाते!! ती झुळूक उगा सांजवेळी, आपल्यास जाऊन भेटते!! आज इथे , उद्या तिथे, क्षणभर न थांबते!! कोण इथे , कोण तिथे, मनातलं गुपित ओळखते!! अबोल राहिले मी तरी, सगळं काही ऐकते!! ती झुळूक उगा सांजवेळी, सोबतीस माझ्या येते..! © योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
