"मनातले सखे कितीदा सांगुनी प्रेम तुझ माझे कळलेच का नाही!! हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही!! उरल्या या मिठीत माझ्या प्रेमाचा जणू गंध तुझ्या श्वासात तू कधी ओळखलाच का नाही!! भेटीस ती ओढ जणू छळतात ते पंख त्यास तू कधी मुक्त जणू केलेच का नाही!! सांग तू आता सांगू तरी काय आता रित्या त्या मार्गावर तू दिसलीच का नाही!! भेटली एक झुळूक बोलली मझ कित्येक तुझ्या स्वप्नातले गाव तेव्हा भेटले का नाही!! बरसल्या बेफाम पावसाच्या सरी अनेक चिंब तुला पाहून अश्रुसवे बोलल्या का नाही!! रंगवून कित्येक रंग आकाशातले ते इंद्रधनुष्य तुझ्या नी माझ्या प्रेमाचे चित्र काढले का नाही!! हात हातात घेऊन हळुवार ते डोळे भरून अलगद ते तुझ पाहताना दिसलेच का नाही!! माझे मलाच शोधताना उगा आरशात पाहताना शोधूनही मला तेव्हा मी भेटलोच का नाही!! सांग सखे एकदा , मनातले तुला कितीदा सांगुनी प्रेम तुझ माझे कळलेच का नाही …!!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
सांग सखे || Sang Sakhe || Marathi Poem ||
