सहवास || कथा भाग ५ || SAHAWAS MARATHI KATHA ||

भाग ५

“माझ्या नकारा नंतरही मला आपलस केलं याचा आनंद खूप होता त्याला!! “
सुमेधा मनोजकडे पहात म्हणाली.
“एवढं सगळं झालं तेव्हा तुला मला काहीच का सांगायचं नव्हतं ??” मनोज सुमेधा पहात होता.
“मला तुला यात गुंतवायचं नव्हतं !! “
“तू असा विचारच कसा केलास पण ??”
“त्यावेळी मला दुसर काहीच सुचलं नाही!! तुझ्यापासून दूर जायचं आणि हे सगळं विसरायचं हेच ठरवल होत मी!! आपलं प्रेम !! सगळं काही विसरायचं होतं !! पण कितीही झाल तरी मला ते नाही जमलं!! एवढं सगळं होऊनही मी रमणला सगळं विसरून माफ करण्याचा प्रयत्नही केला!! पण मनातल्या यातना काही कमी होत नव्हत्या !! ” सुमेधा दरवाज्यात उभे राहून बोलू लागली.

मनोज सुमेधाच्या या सगळ्या घडलेल्या गोष्टी ऐकून स्तब्ध झाला. आज सुमेधा बद्दलचा राग त्याच्या मनात कुठेच राहिला नाही. ती अखंड जळत राहिली.
“त्यानंतर पाच दहा वर्ष असच चालू राहील. सायली माझ्या आयुष्यात होती हे एकच सुख माझ्यासाठी होत. तिच्यासाठीच जगायचं ह्या एकाच निर्णयावर मी जगत होते.!!” सुमेधा हातात कॉफी घेतं मनोजला देत बोलत होती.

“तुझ्या आयुष्यात एवढं सगळं झालं याची साधी कल्पनाही मला नव्हती!! तुझ्यापासून दूर जावं म्हणून मी इकडे आलो !! आई बाबांनी खूप मनवल मला लग्नासाठी !! पण तुझी जागा दुसऱ्या कोणाला द्यावीशी वाटली नाही!!” मनोज आता सुमेधाला आपल्या मनातलं सांगत होता.
“पण माझ्या आयुष्याची शिक्षा तुला का मनोज ??! हा एकांत खूप वाईट असतो रे !! आयुष्यात सहवास हवाच ना !! ” सुमेधा मनापासून बोलत होती.
“तुझ्या आठवणींचा सहवास होताच ना मला !! “
“तुझ्याही आठवणींचा सहवास होताच रे !! पण एक सोबती हवाच ना !! “
“तुझ्याशिवाय कोणीच नाही भेटलं मला आपलस !! प्रयत्न केला विसरायचं पण नाही जमलं !! ” मनोज स्मित हास्य करत म्हणाला. त्या हास्यात सुमेधा बद्दल प्रेम आजही दिसत होत.
दोघांच्या गप्पा कित्येक वेळ चालल्या, मनोजला संध्याकाळ झालेली सुद्धा कळली नाही. अखेर तो जायला निघाला.

“पुन्हा भेटशील !!” मनोज सहज सुमेधाला विचारत होता.
“बघुयात !! नक्की भेटुयात !!”
मनोज सुमेधा आणि सायलीचा निरोप घेऊन निघाला. कित्येक विचारांचं काहूर त्याच्या मनात
उधळल होत. नक्की चुकलं कोण याचाच निर्णय त्याला करता येत नव्हता . मला काहीच न सांगता रमण सोबत लग्न करणारी सुमेधा चुकली होती की रागाच्या भरात तिला तसेच सोडून निघून जाणार मी चुकलो होतो. तिच्यावर बलात्कार झाला. झाला खरा !! पण तो बलात्कार राहिलाच नाही !! पण एवढं कळूनही मी तिला आपलस केलं असतं का ?? कित्येक विचार आणि मन यांचं द्वंद्व चाललं होत. चूक काय नी बरोबर काय याच्या पलिकडे सार राहील होत. जे व्हायचं ते झाल होत पण पुढे हे नात आजही तसच राहील होत.

“आई !! तुझ बाबांवर का प्रेम नव्हतं ते आज कदाचित मला कळत नसेन !! पण तुझ्या डोळ्यांतील अश्रू खूप काही बोलून गेले मला आज !! ” सायली सुमेधाला जाणाऱ्या मनोजकडें पाहत म्हणाली.
सुमेधा काहीच न बोलता फक्त सायलीकडे पाहत होती.
“आपली व्यक्ती आपल्या पासून दुरावली की त्रास होतोच ना !! “
“चल सायली !! तुझ आवरून झाल ना !! “
“हो आई !! “
” आज किंवा उद्या तिकडचे काम झाले की आपण निघुयात !! “
“हो चालेल !! पण आई या सगळ्याची खरंच गरज आहे का ??” सायली प्रश्नार्थक नजरेने सुमेधाकडे पाहू लागली.
“हो !! आहे याची गरज !! कदाचित मला तुला !! आणि सगळ्यांनाच !! “
सुमेधा आता नव्या वटांच्या शोधात होती. कदाचित काही नव्या दिशेस तिला भान हरवून जायचे होते. २५ वर्षाचा तो सहवास आणि त्या नंतर जीवनात पुन्हा आलेले जुने प्रेम याची कुठे घालमेल तर होत नाही ना असा प्रश्न तिला पडला होता. म्हणून याची गरज आहे!! सायली खरंच आहे !! सुमेधा मनात बोलत होती.
मी पंख पसरून पाहिले आकाश
त्यात मज दिसले आभास
शोधूनी घेतली वाट नव्या प्रवासास
घेऊन जाते सोबती चंद्र नी ताऱ्यास
असाच हवा मज आयुष्याचा सहवास !!!
सुमेधा आज कित्येक वेळ शांतच होती. सायली ही तिला जास्त बोलत नव्हती. मनोज गेल्यापासून सायलीच आई बद्दलच कदाचित मन बदलून गेलं होत. कदाचित तिला ही ते अबोल प्रेम कळून चुकलं होतं. अशातच दोन तीन दिवस गेले. सुमेधा कित्येक वेळ काहीतरी लिहीत बसली होती. सायली आपल्या कामात व्यस्त होती.

मनोज ही आता पुन्हा सुमेधा ला पुन्हा भेटायला उत्सुक होता. सकाळपासून घरी सार आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. अचानक दरवाजा वाजल्याचा आवाज झाला. आणि तो तिकडे गेला.
“काय रे??” मनोज दारात बघत बोलला.
“साहेब पत्र आले आहे तुमचं !!”
“कोणाचं रे पत्र !! दे !! ” मनोज हातात पत्र घेत म्हणाला.
दरवाजा बंद करत तो पत्र उघडत होता.

प्रिय मनोज ..

क्रमशः …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *