सहवास || कथा भाग ४ || LOVE STORY ||

भाग ४

जळत्या दीव्या सोबत ती रात्र अखंड जळत राहिली. सुमेधा त्या रात्री कित्येक अश्रुंशी बोलत होती. पण ऐकणार ते कोण! मनातल्या विचारांचं गाठोड उघडायचं तरी कुठे !! कित्येक आणि कित्येक विचार.

सकाळ होताच सुमेधा सगळं घर नीट आवरून घेऊ लागली. कोणत्याही क्षणी मनोज येईल आणि मग!! या विचारांनी ती काम करत होती. सायली कित्येक वेळ खोलीतून बाहेर आलीच नाही. सुमेधा अखेर तिला उठवायला गेली.

“सायली !! सायली!! उठ आता चल !!”
कित्येक वेळ हाक मारल्या नंतर सायली उठून बाहेर आली.
“आई !! ” सायली सुमेधा कडे पाहत म्हणाली.
“काय ग??” सुमेधा काम करत करतच तिला बोलत होती.
“आई !! काल जे झालं त्याबद्दल मला माफ कर !! “
“अरे !! त्यात काय एवढं !! जा बर आवरून घे !! मनोज सर कधीही येतील !! “
“हो आई !! पण मला माफ कर !! आयुष्यात आपण कोणावर प्रेम करावं की करू नये !! हे सांगण्याचा अधिकार किंवा त्याबद्दल बोलायचा हक्क आपल्याला नसतोच !! “
सुमेधा हातातलं काम बाजूला ठेवून सायलीकडे बघू लागली.
“बाळ !! कोणावर प्रेम होईल हे जस आपल्या हातात नसतं !! तसच कोणावर प्रेम कर हे पण आपण नाही सांगू शकत !! सगळं मनच ते बोलत! “
सायली एक हास्य देत सुमेधाकडे पाहू लागली.
“जा आवर पटकन !! “
सायली आईकडे पाहत निघून गेली.

“आज कदाचित मनातलं सारं बोलून मोकळं व्हावं असं का वाटतं. मनोज कधीही येईल!! आणि कित्येक जुन्या आठवणींना घेऊन येईल. त्या बागेतील त्याची आणि माझी पहिली भेट आणि बाबांना मी त्याच्यावर प्रेम करतेय हे सांगणं !! किती ते धाडस होत न माझ!! अखंड प्रेम करत राहिले मी त्याच्यावर !! लग्न केलं रमण सोबत पण हे मन त्याचंच राहील !! शेवट पर्यंत !!! ” सुमेधा कित्येक विचार करत सारं काम करत होती.

अचानक दरवाजा वाजला. सुमेधा चमकुण दरवाज्याकडे पाहू लागली. आणि लगबगीने दरवाजा उघडायला गेली.समोर मनोज होता. एक स्मित हास्य करत तो म्हणाला.
“खूप वेळ लागला तुझ घर शोधायला!!”
“होका !! येणा !! “
मनोज घरात येत म्हणाला.
“थोडा उशीरच झाला !!
“बस ना !! मी पाणी आणते तुझ्यासाठी!! “
मनोज समोरच्या सोफ्यावर बसला. सुमेधा पाणी आणायला आत गेली. शेजारच्या टेबलावर सुमेधा आणि रमणचां फोटो तो बघू लागला. तितक्यात सुमेधा जवळ येत म्हणाली.
“२० वर्षां पुर्वीचा आहे फोटो!! “
“हो !! ते कळलं मला !! वय बोलत माणसाचं !! फोटोतही!! “
मनोज पाण्याचा ग्लास घेत म्हणाला.
तितक्यात सायली तिथे आली. आपल्या सरांना समोर पाहून गोंधळली.
“ये ना !! ” सुमेधा तिच्याकडे पाहत होती.
“सर तुम्ही माझ्या आईला ओळखता हे माहीतच नव्हतं मला !! काल आई म्हणाली मला !! “
सायली अगदी सहज मनोजला बोलू लागली.
“आम्ही दोघे जुने मित्र आहोत !! आम्ही दोघेच कित्येक वर्षानी भेटतोय !! दोन दशकं गेली आणि पुढे ५ वर्ष !! “
मनोज सायलीकडे पहात बोलला.

तिघे कित्येक वेळ बोलत होते. सोबत जेवणही केलं.जेवण झाल्यानंतर सायली आपल्या खोलीत निघून गेली.सुमेधा आणि मनोज घराच्या अंगणात बसून बोलू लागले.

“खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! ” सुमेधा मनोजकडे बघू लागली.
“आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास आपल्या आवडत्या व्यक्तीचा असेल तर बर वाटत !! नाहीतर एकांत कधीही गोडच वाटतो !! माझ्यासारखा !! “
सुमेधाला या बोलण्यात कित्येक दुःख साचल्याच जाणवलं.
“खरंय तुझं !! आवडत्या व्यक्तीचा सहवास असेल तर आयुष्य छान वाटतं !! नाहीतर सहवासात असेन तरी मन एकटच राहत !! माझ्यासारखं !! ” सुमेधा मनोजकडे एकटक पाहू लागली.
“इतकंच एकटं होत हे मन तर कधी आपल्या लोकांना शोधावं अस वाटल नाही ??”
“मन अडकून पडलं होत!! रक्ताच्या नात्यात !! “
“म्हणजे आजही मी शून्यच आहे !! ” मनोज अगदी भरल्या मनाने म्हणाला.
“काही गोष्टी बांधून ठेवतात रे मनोज !! “
“मला त्या गोष्टी ऐकायच्या आहेत !! ” मनोज अगदी निर्धाराने बोलला.
सुमेधा कित्येक क्षण अबोल राहिली. मनाशी कित्येक विचार करून ती बोलली लागली.
“तुला ऐकायचे आहे ना!! मी रमण सोबत का लग्न केले ते !! “
मनोज होकारार्थी मान डोलावु लागला.
“तर ऐक मग !! ” सुमेधा आता मनमोकळे बोलू लागली.
“तुझ्या आणि माझ्या प्रेमाबद्दल मी जेव्हा घरी सांगितल तेव्हा बाबांचा साफ नकार होता!! तुझ्याकडे मला द्यायला काहीच नाही असं त्यांना वाटत होत!! त्याच काळात रमणच स्थळ माझ्यासाठी आल. मुलगा श्रीमंत आहे !! खूप कमावतो असे वाटून बाबांना स्थळ आवडल.!!” मनोज सगळं मनापासून ऐकत होता.
“पण माझा लग्नाला साफ नकार होता!! बघायचाही कार्यक्रम झाला!! मला बघताच मी रमणला आवडले!! पण काही दिवसात बाबांनी त्यांना नकार कळवून टाकला!! रमणला हे खरच वाटेना !! आणि तो मला पाहताच प्रेमात पडला होता!! त्याला हा नकार नको होता!! नंतर कित्येक दिवस तो माझ्या मागे होता!! सुमेधा भरल्या डोळ्यांनी सांगू लागली.

“पुन्हा एक दिवस तो मला बाहेरच भेटला!! मला बळजबरी करत त्याच्या घरी घेऊन गेला.!! घरी त्यावेळी कोणीच नव्हते !! २ दिवस माझ्यावर अत्याचार करत होता. इकडे आई आणि बाबा दोघेही माझा शोध घेत होते!! पुन्हा घरी आल्यावर सगळी हकीकत मी दोघांनाही सांगितली!! पण समाज !! लाज !! आणि इज्जत !! या गोष्टीत तो माझ्यावरचा बलात्कार माझ्या घरच्यानीच झाकून घेतला!! ” मनोजला काय बोलावे कळत नव्हते. तो फक्त ऐकत होता.
“तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम होते!! अशात काही महिने गेले !! माझ्या पोटात बाळं आहे असं कळताच बाबां गप्प झाले !! पण आई मला कित्येक विनवण्या करू लागली. अखेर मी लग्नाला होकार दिला !! “
सुमेधा शांत झाली.

“पण तू त्याचवेळी पोलीसात तक्रार का केली नाहीस ??”
“समाजात काय इज्जत राहील !! माझ्यावर बलात्कार झालाय हे जर बाहेर कळाल तर काय होईल अशा कित्येक भीती मला घरच्यांनी दाखवल्या !! आणि असही रमण लग्नासाठी चालून आलेल स्थळ होतच ना!! अस म्हणून २५ वर्षाचा त्याचा आणि माझा नरक सहवास सुरू झाला!! !!”सुमेधा डोळ्यातले अश्रू पुसून म्हणाली.
“तुला माहितेय मनोज !! एक गोष्ट आजही माझ्या मनात आहे !! स्मरणात आहे !! माझ्यावर नाहीतर माझ्या दिसण्यावर प्रेम करणाऱ्या रमणे मला आपलस केल्या नंतरचे ते हास्य!! आजही मला लक्षात आहे !! “सुमेधा उठतं म्हणाली.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *