"अचानक कधी समोर तू यावे
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे
नजरेने सारे मग बोलून टाकावे
मनातले अलगद तुला ते कळावे!!
हात तुझा अलगद हातात घ्यावे
अबोल मी त्यास घट्ट धरावे
नकळत तेव्हा तू साथ द्यावे
सोबतीस माझ्या नेहमीच राहावे!!
स्वप्नात माझ्या जरी तू उरावे
चांदण्यात एक उगा मी शोधावे
कधी कळले ,कधी न कळावे
कुठे गुंतले ,कुठे हरवून जावे!!
इथे बहरली फुले उगा बघावे
त्यास मनातले सारे सांगून टाकावे
बहरल्या कळ्यानी तुलाच पहावे
अलगद त्यांनी मग गालात हसावे!!
अबोल या प्रेमास शब्द न मिळावे
किती शोधले परी सारे अबोल रहावे
हळूवार या मनास कसे आज सांगावे
भाव या मनीचे कसे ओठी आणावे!!
ओढ ही कोणती कसे आज कळावे
विरह हा असा की डोळ्यातून वहावे
अधीर या प्रेमात फक्त तुलाच पहावे
शब्द ते पुसट तेव्हा ओठांवर यावे .....!!"
✍️©योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*