हसून घे वेड्या 
 आज तुझा जयजयकार आहे!!
 तुझ्या नीच मनाचे कवाड 
 आज पूर्ण उघडे आहे!!
मी बंदिस्त आणि शांत जरी
 माझ्या मनाची शांती अटळ आहे!!
 या बंधांचे आज जणु 
 खूप तुझ्यावर उपकार आहे!!

 हसून घे वेड्या
 आज तुझा जयजयकार आहे!!
खोट्या महालात तुझ्या
 तूच स्वतःस फसवतो आहेस!!
 तुझ्या कित्येक पापांचे मी आत
 हिशोब करतो आहे!!
 कधी कित्येक नात्यांचे बंध तोडले
 कोणा आपल्यास तू दूर केलं आहेस!!
 तुझ्या कृत्याचे विचार इथे 
 आज होत आहेत!!

 हसून घे वेड्या
 आज तुझा जयजयकार आहे!!
तू अहंकारी जरी 
 मी नम्र भाव आहे!! 
 तुझ्या कित्येक क्रुरतेची इथे जाणं आहे!!
 मी हरलो जरी तूही हरला आहेस
 तुझ्या नीच मनाचे 
 सर्व भाव कळले आहेत!!
 हे बंध हळू हळू आता सैल होत आहेत!!

 हसून घे वेड्या
 आज तुझा जयजयकार आहे!!
बंध तुटतील जेव्हा हे
 तुझे राज्य मी उधळणार आहे!!
 मनाची ही ढाल आता
 अशांत होत आहे!!
 न डगमगत हे आता पाऊल उचलत आहे!!
 तुझ्या नीच मनास संपवण्या 
 मी सज्ज होत आहे!!

 हसून घे वेड्या
 मी सत्य येत आहे!!

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE