बरसून जाण्या, पुन्हा आठवात यावी !! सखी सोबती ती, सांज होऊन यावी !! कुठे अलगदशी , झुळूक होऊन जावी!! कुठे हुरहूर ती, मनास लावून जावी!! साऱ्या नभात ती, रंग जणू उधळावी !! साऱ्या आयुष्याची, साथ ती व्हावी !! सावल्यात तेव्हा, कूठे ती शोधावी !! सावली होऊन , हृदयात ती राहावी !! कसे सांगावे, कशी ती लिहावी !! मनातल्या तिला, गोष्ट एक सांगावी !! क्षणात येता, नजरेत त्या ठेवावी !! क्षणात जाता, नजरेतून ओघळावी!! सखी ती हसता, ती रात्रही हसावी !! सखी ती बोलता , ती रात्रही बोलावी !! हळूवार ती , गंध होऊन पसरावी !! अलगद ती, पुन्हा आठवात यावी !! सखी सोबती ती, सांज होऊन यावी !! ✍️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
तिला कळावे मला कळावे शब्द मनातील असे शब्द तयाचे शब्द न राहिले हासु उमटे जिथे
दिवस माझे नी तुझे गोड त्या स्वप्नातले चांदण्या रात्रीचे क्षण परतुन आज यावे सखे सोबत तुझी अंधारल्या त्या रात्री लागी मनाला ओढ आज मिठीत यावे
प्रेम केलं तरी राग येतो नाही केलं तरी राग येतो तुच सांग प्रेम आहे की नाही पाहील तरी राग येतो नाही पाहिल म्हणून राग येतो खर सांग चोरुन पाहतेस की नाही
नकळत तेव्हा कधी चुक ती झाली होती प्रेम झाल अचानक जेव्हा ती लाजली होती ठरवल होत तेव्हाच आपल्याला हीच पाहिजे होती कस विचारू तिला जेव्हा ती अनोळखी होती
धुंद हे सांज वारे छळते तुला का सांग ना? का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना!! डोळ्यात हे भाव जणु विरह हा तो कोणता भावनेस शब्द दे एकदा तु…
सतत तिच्या विचारात राहणं तिच्या साठी चार ओळी लिहणं लिहुनही ते तिलाच न कळनं यालाच प्रेम म्हणतात का? न राहुनही तिला बघावं डोळ्यात मग साठवावं अश्रु मध्ये दिसावं यालाच प्रेम म्हणतात…
ऐक ना एकदा मन हे बोलती हरवली सांज ही सुर का छेडली नभात ही चांदणी पुन्हा का पाहुणी चंद्रास ओढ का तुज पाहता क्षणी उतरुन ये या गोड स्वप्नातुनी मिठीत घे…
नजरेतूनी बोलताना तु स्वतःस हरवली होती ती वेळही अखेर क्षणासाठी थांबली होती ती वाट ती सोबत ती झुळुक ही धुंद होती तुझे शब्द ऐकण्यास ती सांज आतुर होती
बरंच काही बोलताना ती स्वतःत नव्हती हरवलेल्या आठवणीत खोलं क्षणात होती विखुरलेल्या मनात कुठे दिसत नव्हती माझ्या सावलीस शोधताना स्वतः अंधारात होती
न कळावे मनाला काही तुझे हे भाव सखे तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे कसे समजावे डोळ्यांना ही ते पाहतात ती तुच असे रागावलेल्या कडां मध्ये ही माझे चित्र…
गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते शब्दांच्या या वहीत लिहून काहीतरी ठेवते सुकुन गेली तरी पुन्हा सुगंध आजही देते
कधी कधी वाटतं अबोल होऊन रहावं तुझ्याकडे पहात नुसत तुझ बोलन ऐकावं पापण्यांची उघडझाप न करता एकटक तुझ्याकडे पहावं आणि तुझ्या बरोबर सतत राहुन फक्त तुझाच होऊन जावं
"तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला माथ्यावर तुझ्या भावना अबोल होऊन बोलल्या त्या मनावर माझीच तु आणि तुझाच मी एक जाणीव होती नात्यावर विसरुन जाईल जग हे सारे जादु कसली ही…
कधी हळुवार यावी कधी वादळा सारखी यावी प्रेमाची ही लाट आता सतत मनात का असावी? तु सोबत यावी ऐवढीच ओढ लागावी मनातल्या भावनांची जणु नाव किनारी का जावी?
गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते शब्दांच्या या वहीत लिहून काहीतरी ठेवते सुकुन गेली तरी पुन्हा सुगंध आजही देते
आठवणींचा समुद्र आहे जणु तु सतत लाट होऊन का यावीस कधी मन ओल करुन माझे तु पुन्हा का परतावी वार्यासवे कधी वाहताना मी तुझी वाट त्यास सांगावी ती प्रत्येक झुळुक तेव्हा…
शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते डोळ्यात तुझ्या पाहताच तुझ्याकडेच का ओढली जाते मिठीत तुझ्या यावे आज ती रात्र का…
मी वाट पाहिली तुझी पण तु पुन्हा आलीच नाही वाटेवरती परतुन येताना तुझी सोबत भेटलीच नाही क्षणात खुप शोधताना तुला स्वतःस मी सापडलो नाही मी आणि तुझ्यात तो माझाच मी राहिलो…
हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत चिंब भिजलेले ते क्षण आजही पुन्हा भेटत आहेत
संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी