बरसून जाण्या, पुन्हा आठवात यावी !! सखी सोबती ती, सांज होऊन यावी !! कुठे अलगदशी , झुळूक होऊन जावी!! कुठे हुरहूर ती, मनास लावून जावी!! साऱ्या नभात ती, रंग जणू उधळावी !! साऱ्या आयुष्याची, साथ ती व्हावी !! सावल्यात तेव्हा, कूठे ती शोधावी !! सावली होऊन , हृदयात ती राहावी !! कसे सांगावे, कशी ती लिहावी !! मनातल्या तिला, गोष्ट एक सांगावी !! क्षणात येता, नजरेत त्या ठेवावी !! क्षणात जाता, नजरेतून ओघळावी!! सखी ती हसता, ती रात्रही हसावी !! सखी ती बोलता , ती रात्रही बोलावी !! हळूवार ती , गंध होऊन पसरावी !! अलगद ती, पुन्हा आठवात यावी !! सखी सोबती ती, सांज होऊन यावी !! ✍️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
