"पाहाण्यास या सूर्यास मी ,आज पुन्हा तयार आहे !!
 भेट घेऊन क्षणांची तो, आज माझ्या पुढ्यात आहे !!

 किरणांनी दाखवले ते मार्ग, चालण्यास मी तयार आहे !!
 सारे आकाश पसरून जावे, त्यास कवेत घ्यायचे आहे !!

 झेप घेत पाखरांच्या , पंखात बळ येत आहे !!
 उमलती ती कळीही आता, अलगद वर पाहत आहे !!

 कालचे ते मनातले , सारें निघून जात आहे !!
अंधार तो कोपऱ्यातला, सहज पसार होत आहे !!

 जागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !!
 अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !!

 पसरल्या त्या धुक्यात, स्वप्न धूसर होत आहे!!
 पानावर दवबिंदू होऊन, मला पुन्हा भेटत आहे !!!

 कशी ही सुंदर सकाळ , हळूच मला बोलत आहे !!
 माझ्या मिठीत येऊन, अलगद ती हसत आहे !!

 पाहण्यास या सूर्यास मी, आज पुन्हा तयार आहे !!'

 ✍️ योगेश '

 ALL RIGHTS RESERVED
SHARE