चहाची मजा घेत मावळतीचा सुर्य पहाणे माझे सर्वात आनंदाचे क्षण . पण हे क्षणही इतके लगबग जातात जणु मावळत्या सुर्यास विचारावेसे वाटते की .. "थंड ही मावळती आठवणीतल्या कुणाची, सुर्यालाही लगबग ही वाट पाहते का कोण त्याची !!!" विचारावसं रोज वाटतं पण का कुणास ठाऊक पण शब्द ही थोडे अबोल होतात .. आणि वाटतं .... "जीवनातल्या या क्षणी, आज वाटते मनी, हरवले गंध हे, हरवी ती सांजही!! क्षण न मला जपले, ना जपली ती नाती, दुर त्या माळावरी, होत आहे मावळती!! भरकटली वाटही, ना दिसली ती परतही, वाटले या मनतरी, ना भेटली ती परतही!! सुर्य झाला लालबुंद, आज या माझ्या मनी, वाटते हवेहवेसे, पण कोणच नाही या क्षणी!! जीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी... !!!!" -योगेश खजानदार. .. *ALL RIGHTS RESERVED*
