"कदाचित आता मी पुन्हा
 तुला भेटणार ही नाही!!
 मनातल माझ्या कधी आता
 तुला सांगणारं ही नाही!!

 हसत माझ्या भावनांचा
 पाऊस ही कधी येईल!!
 त्या पावसात तुला आता
 मी दिसणार ही नाही!!

 विसरून जाशील तुही आता
 एक ओळख फक्त राहिल!!
 त्या अनोळखी जगात तुला
 आठवण माझी होईल!!

 शोधतील डोळे तुझे मझं
 पण मी सापडणार ही नाही!!
 कारण तुझ्यासाठी दुर झालेला
 मी ही हरवुन जाईल!!

 शोधु नकोस उगाच मझं तु
 तुला भेटणार ही नाही!!
 कारण मनातल कधी आता
 तुला सांगणारं ही नाही!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*