FavoriteLoadingAdd to favorites

“आस लागे जीवा
साथ दे तु मला
वाट ती हरवली
शोधीसी रे तुला


राख झाली मना
जाळते जाणीवा
मन हे तरीही
शोधीसी रे तुला

एक भास आभास
डोळ्यात एक आस
तुज पाहण्या कडा
शोधीसी रे तुला

मी शोधाता चौफेर
सापडावी तु समोर
वाट ती भेटण्या
शोधीसी रे तुला!!”

✍️योगेश

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा