सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची??
हरवलेल्या वाटा!! आणि ओढ त्या कोणाची??
बोल तू खरे !! रुखरुख आहे ना मनाची ??
आठवांचा गंध!! आणि भेट ती पावसाची??
डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची??
एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ??
जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची??
वादळात भेट व्हावी!! होईल का क्षणांची ??
उद्ध्वस्त घरात, सोय होईल का निवाऱ्याची??
इथेच पुन्हा यावे!! हीच ओळख नात्यांची??
संवाद आणि वाद !! हीच उत्तरे प्रश्नांची !!
सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची??
✍️ योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*