"शेवटचं एकदा मला
 बोलायचं होत!!
 प्रेम माझ तुला
 सांगायच होत!!

 सोडुन जाताना मला
 एकदा पहायच होत!!
 डोळ्यातली आसवांना
 बोलायचं होत!!

 का कसे कोण जाणे
 नात हे तुटत होत!!
 चुक तुझी की माझी
 मन हे रडत होत!!

 शेवटचं एकदा मला
 बोलायचं होत…!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  चेहरे अनोळखी ..!! CHEHARE ANOLAKHI MARATHI KAVITA !!