"एक दिवस असेल तो, मला पुन्हा जगण्याचा!! लहानपणीच्या आठवणीत, पुन्हा एकदा रमण्याचा!! शाळेतल्या बाकड्यावर, पुन्हा जाऊन बसण्याचा!! मित्रांसोबत एकदा, दंगा मस्ती करण्याचा!! एक दिवस असेल तो, पाऊसात भिजण्याचा!! आजारी पडलो म्हणुन, शाळा बुडवण्याचा!! गृहपाठ केला नाही म्हणुन, छडी खाण्याचा!! एक दिवस असेल तो, सहलीला जाण्याचा!! मित्रांसोबत मस्ती करण्याचा!! आईने दिलेल्या डब्यातील, बटाट्याची भाजी खाण्याचा!! एक दिवस असेल तो, मैदानावर दंगा करण्याचा!! चेंडु गेला म्हणुन, खेळ थांबण्याचा!! नक्की जिंकल कोण? याचा अंदाज लावण्याचा!! एक दिवस असेल तो, शाळेची घंटा वाजण्याचा!! शाळा सुटली म्हणुन, पळत घरी जाण्याचा!! मस्त सगळ आवरुन, अभ्यासाला बसण्याचा!! एक दिवस असेल तो, शाळा कायमची सुटण्याचा!! आठवणीतल्या शाळेत, दिवस तो जगण्याचा! पुन्हा शाळेत घेऊन जाण्याचा!! पुन्हा मित्र भेटण्याचा! दंगा मस्ती करण्याचा!! मधल्या सुट्टीत ….!!" -योगेश
