शब्द माझे || MARATHI STATUS ||

Share This
"लिहिल्या कित्येक शब्दांनी
 मलाच बोल लावले आहेत!!
 माझ्या मनातल्या तुझ्या ते
 प्रेमात नकळत पडले आहेत!!

 कधी हसले ओठांवर जेव्हा
 कागदास ते बोलले आहेत!!
 कित्येक गुपिते तेव्हा जणू
 पानास त्यांनी सांगितले आहेत!!

 राहिले जेव्हा मनातच सारे
 अबोल ते झाले आहेत!!
 येता समोरी तू अचानक
 उगाच मग अडखळले आहेत!!

 गुणगुणत्या क्षणात तेव्हा
 अलगद ते हरवले आहेत!!
 कधी मिठीत , कधी दूर
 कवितेत त्या बोलले आहेत!!

 सांग सारे मनातले तुझ्या
 मलाच हट्ट करत आहेत!!
 तुझ्यासाठी हे भाव जणु
 मनी त्या दाटले आहेत!!

 नकळत चोरून मग तेव्हा
 तुलाच ते बोलत आहेत!!
 ते शब्द माझेच मला मग
 फितूर का झाले आहेत??

 लिहिल्या कित्येक शब्दांनी
 मलाच बोल लावले आहेत …!!!!"
 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा…

बाप्पा निघाले गावाला || GANPATI BAPPA MORAYA ||

तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील. मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल. पुढच्या…

आगमन गणरायाचे!! Ganapati Bappa Moraya !!

गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न…

मी एक प्रवाशी स्त्री || STRI MARATHI ESSAY ||

Share This या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥ ज्या सरस्वतिचे,…

एक हताश मतदार || POLITICS || MARATHI ||

आपल्याच नेत्यावर विश्वास नाही म्हणून डांबून ठेवणं, सत्ता स्थापन होत नाही म्हणून घोडेबाजार करणं याला म्हणायचं तरी काय ?? ज्या…

मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||

"बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत.…

Next Post

राजं मुजरा || CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ||

Tue Feb 19 , 2019
शस्त्र, शास्त्र आणि शौर्य यांचं एक रूप राजं माझे हाती भवानी तलवार ध्येय हिंदवी स्वराज्य आणि वादळाशी झुंज असे आहेत राजं माझे