शब्द माझे || MARATHI STATUS ||

"लिहिल्या कित्येक शब्दांनी
 मलाच बोल लावले आहेत!!
 माझ्या मनातल्या तुझ्या ते
 प्रेमात नकळत पडले आहेत!!

 कधी हसले ओठांवर जेव्हा
 कागदास ते बोलले आहेत!!
 कित्येक गुपिते तेव्हा जणू
 पानास त्यांनी सांगितले आहेत!!

 राहिले जेव्हा मनातच सारे
 अबोल ते झाले आहेत!!
 येता समोरी तू अचानक
 उगाच मग अडखळले आहेत!!

 गुणगुणत्या क्षणात तेव्हा
 अलगद ते हरवले आहेत!!
 कधी मिठीत , कधी दूर
 कवितेत त्या बोलले आहेत!!

 सांग सारे मनातले तुझ्या
 मलाच हट्ट करत आहेत!!
 तुझ्यासाठी हे भाव जणु
 मनी त्या दाटले आहेत!!

 नकळत चोरून मग तेव्हा
 तुलाच ते बोलत आहेत!!
 ते शब्द माझेच मला मग
 फितूर का झाले आहेत??

 लिहिल्या कित्येक शब्दांनी
 मलाच बोल लावले आहेत …!!!!"
 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*