“दादा !!” रामा ने हाक मारली.
“कोण आहे रे!!”
“दादा !! तुम्हाला भेटायला कोणी तरी आलय बाहेर?!!”
“बर थांब!! आलो मी !!बसा म्हणं !!”
कोण आलं आहे. पहायला सुहास बाहेर गेला. समोर एक स्त्री बसली होती. सुहास तिच्याकडे पहाताच थोडा गोंधळुन गेला. ती शितल होती. कित्येक वर्षां पुर्वीच प्रेम पुन्हा त्याच्या समोर होतं.
“शितल !! किती दिवसांनी भेटतेयस !”
“यावं लागलं रे मला!! तुझ्या शब्दांनी खेचुन आणलं मला आज!” सुहास ने लिहिलेलं पुस्तक तिच्या हातात होतं.
“तु वाचलंस पुस्तक??”
“हो!! वाचलं मी!! तुझ माझ्यावर इतक प्रेम होतं हे मला कधी कळलंच नाही! !”
सुहासला काय बोलावं तेच कळेना. शितल अशी आपल्याला भेटायला येईल याचा त्याने कधी विचारही केला नव्हता
“तु अशीच पुन्हा परतावी
मी किती तुझी वाट पाहावी
तुझं कळेल हे प्रेम किती
परतुन ती सांज यावी!!
किती गोड लिहिलंयस हे तु!!” शितलने सुहासच्या पुस्तकातील काही ओळी म्हणुन दाखवल्या.
“तु निघुन गेल्यावर मला काहीच कळेना! तुझ्यावर रागावु की स्वतःवर तेच कळेना! शेवटी मनातल कुठेतरी मोकळं करायचं होतं!! या शब्दांनी आधार दिला!!’ सुहास डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
“सगळं मनासारखं होतं अस नाही रे! ‘ शितलंही आता मनातील दुख डोळ्यातुन टिपत होती!!
“आपण का वेगळे झालो याच पुन्हा मला बोलायचं नाहीये! !’ पण सुहास मी ही खुप वाट पाहिली रे तुझी!!”
“शितल मी बंधनात अडकलो होतो!! ज्या शब्दांनी आज माझ प्रेम पुन्हा मला भेटायला आणलं त्याच शब्दांनी त्यावेळी माझा घात केला!!” सुहास शितलच्या हातातील पुस्तकाकडे बघत बोलत होता.
“बाकी, आज माझ्या प्रेमानेच माझ्या पुस्तकाची स्तुती केली !! छान वाटलं.!! “
“पण असं समजु नकोस हं !! मी भेटायला आले म्हणुन माझा रुसवा जाईल! जवळं होतास त्यावेळी कधी ऐकवली नाहीस पण आता तुला माझ्यासाठी कविता ऐकुन दाखवावी लागेन बरं!!”
शितलं गोड हसतं म्हणाली.
“या पुस्तकातीलच एक ऐकवु??” सुहास तिच्याकडचे पुस्तक हातात घेत म्हणाला.
“हो ऐकवं ना!!’
“पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे
तु समोर असताना
व्यक्त व्हावे मन जसे
ती सांज तो वारा
पुन्हा ती वाट दिसे
ते नभ ही पाहता
चांदणी ती एकाकी असे
आठवणीत शोधताना
तु आसवात दिसे
चंद्र हा हरवला
मनी का सल असे
शब्दांत तुझ पहाताना
एक भास का दिसे
तु पुन्हा भेटावीस
मन हे अधीर दिसे
पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे!!! “
सुहास शितलकडे बघुन कविता म्हणाला.
“व्वा खुप छान! सुहास !! खरंच आज मला खुप बरं वाटलं तुला भेटुन!! मनातल सगळं बोलुन !! ” शितलं डोळ्यातील अश्रू टीपत म्हणाली.
“मला ही बरं वाटलं तु मला भेटायला आलीस.!! आपलं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते तसंच राहिलं!! क्षणांनी थोडी धुळ केली तर या पुस्तकाने साफ करायची!! आपलं प्रेम नेहमी चिरतरुण राहिलं!! सुहास शितल कडे पाहुन गालातल्या गालात हसला.
शितलाही सुहासचं नवलं वाटलं. काळाने जरी वेगळं केल तरी सुहास शब्दांनी, मनाने तिच्यावर आजही तसाच प्रेम करत होता.
“पुस्तकाच नावं बाकी मस्त आहे!! ..”शब्द की भावना!” शितल पुस्तकाकडे बघत होती.
खुप वेळ झालाय हे शितलंला लक्षातच आलं नाही. घड्याळात पहात ती म्हणाली..
बर… येते मी ! पुन्हा भेटायला येईल नक्की !! काळजी घे!”
एवढं बोलुन शितल निघुन गेली. सुहास तिला जाताना नुसता पाहत होता. ओठांवर एक गोठ हसु होतं पुस्तकात शब्द होते आणि मनात भावना ..
समाप्त
✍️योगेश
READ MORE
प्रेम मला कधी कळलचं नाही
बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही
मनातल्या कोपर्यात कधी कोण दिसलच नाही
म…
Read Moreएकट वाटेन ज्यावेळी
साथ नसेल कोणाची
साद घाल भावा
साथ मिळेल मित्रांची
मैत्री तुझी नी माझी
साथ कशा…
Read Moreमन माझ आजही
तुलाच का बोलत
तुटलेल्या नात्याला
जोड का म्हणत
नको विरह तुझा
सोबत तुझी मागत…
Read Moreआजही हे मन
फक्त तुझच आहे
साथ न तुझी मझ
क्षण तुझेच आहे
मी न राहिलो मझ
श्वास जणु साद ही
ह्रदय हे…
Read Moreतुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी
तुझी आणि माझी मैत्र…
Read Moreरोज मन बोलत
आज तरी बोलशील
रुसलेल्या तिला
कशी आहेस विचारशील
भांडलो आपण
आता विसर म्हणशील
डोळ्यात…
Read Moreआज अचानक मला
आठवणीचे तरंग दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसले
दुरावलास तु नकळत
व्यर्थ त…
Read Moreमी भान हरपून
ऐकतच राही
तुझ्या शब्दातील
गोड भावना!!
हे रिक्त मन
पाहुन चौफेर
नजर शोधता
स्थिर रा…
Read Moreमनात माझ्या
विचारात तु!!
हे प्रेम सखे मझ
आठवणीत तु!!
क्षण हे जगावे
सोबतीस तु!!
नकोच चिंता
मोक…
Read Moreवहीचं मागच पान
तुझ्या नावानेच भरलं
कधी ह्रदय कधी क्षण
कुठे कुठे कोरलं
मन मात्र हरवुन
सांगायलाच …
Read Moreधुंद हे सांज वारे
छळते तुला का सांग ना?
का असे की कोण दिसे
एकदा तु सांग ना!!
डोळ्यात हे भाव जणु
…
Read Moreबास कर नाटक माणुसकीची
दगडाला फासलेल्या शेंदुराची
अरे ते कधी बोलत नाही
देव आहे की कळत नाही
अमाप प…
Read Moreआयुष्याचा हिशोब
काही केल्या जुळेना!
सुख दिल वाटुन
हाती काही उरेना!
दुखाच्या बाजारात
दाखल कोणी ह…
Read Moreमाहितेय मला
तु माझी नाहीस!!!
माझ्या स्वप्नातली
आयुष्यात नाहीस!!
दुरवर उभा मी
वाट पहात तुझी!!
म…
Read Moreशब्दांची गरज नाहीये
नातं समजण्या साठी
भावना महत्वाची
समजलं तर आकाश छोटे
सामावले तर जगही कमी पडेल…
Read Moreविचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला…
Read Moreप्रेमात पडल ना की असच होतं
आकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं
धडधडनार ह्रदय ही दिल होतं
तासन तास …
Read Moreबघ एकदा माझ्याकडे
तो मीच आहे
तुझ्या पासुन दुर तो
आज ही तुझाच आहे
तु विसरली अशील ते
मी तिथेच जगत…
Read More“अस्तित्वाच्या जाणिवेने
लाचार जगन का पत्कराव
स्वाभिमानाने ही तेव्हा
स्वतःही का मरावं
नसेल त्यास …
Read Moreकुठे असेल अंत
मनातील विचारांचा
एक घर एक मी
आणि या एकांताचा
भिंती बोलतील मला
संवाद हा कशाचा
आरश…
Read Moreमाझ्या एकट्या क्षणात
तु हवी होतीस
कुठे हरवले ते मन
तु पाहात होतीस
नसेल अंत आठवणीस
तु खुप दुर हो…
Read Moreवाटा शोधत होत्या मला
मी मात्र स्वतःतच गुंतलो होतो
बेबंद वार्या सोबत
उगाच फिरत बसलो होतो
वळणावर …
Read Moreमला काही ऐकायचंय
तुला काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंय
लाटां सोबत दुर जाताना
…
Read Moreआस लागे जीवा
साथ दे तु मला
वाट ती हरवली
शोधीसी रे तुला
राख झाली मना
जाळते जाणीवा
मन हे तरीही
शोधीस…
Read Moreचांदनी ही हल्ली तिला
खुप काही बोलते
तिच्या मनातल ओळखुन
आपोआप तुटते
ते पाहुन ती ही
हळुच हसते
मना…
Read Moreतुझी साथ हवी होती मला
सोबत चालताना
वार्या सारख पळताना
पावसात भिजताना
आणि ऊन्हात सावली पहाताना!!
तु…
Read Moreफुलांच्या पाकळ्या मधील
सुगंध तुच आहेस ना
ही झुळुक वार्याची जणु
जाणीव तुझीच आहे ना
तु स्पर्श ह्या…
Read More“हवंय मला ते मन
प्रत्येक वेळी मला शोधणार
माझ्या गोड शब्दांनी
लगेच माझं होणारं
मी शोधुनही न सापडता
बै…
Read Moreमला माझ्यात पाहताना
तु स्वतःत एकदा शोधुन बघ
डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये
मला एकदा सहज बघ
मी तिथेच …
Read Moreप्रेम म्हणतं मी
ते व्यक्त करायला जावं
हातात गुलाबाचं फुल देताना
नेमकं तिच्या बाबांनी पहावं
बाबा …
Read More