शब्दांचिया नावे उगाच दोष जातो कवितेत एक भाव तूच आहेस!! तुझेच आहे दिसणे यात, नी तुझेच आहेत भास यास, उगाच खाती भाव ती ओळ शब्दाची त्यात सौदर्य ही तूच आहेस!! एक लय येते बोलते ओठातून, सुरास शोधता फिरते नजरेतून, भेटता सुरू त्या कवीतेस, ते सुरू ही किती सुंदर आहेत!! त्यातील एक गोडवा सखे तूच आहेस!! ऐकावी पुन्हा पुन्हा वाचावी का पुन्हा, त्यात तुझ्याच असण्याची जाणीव आहे!! वहीच्या पानास ही मोह वाचण्याचा, त्यास ही आस तुलाच पाहण्याची आहे!! सखे त्या मनातील एक ओढ तूच आहेस!! कधी राग आहे. कधी प्रेम आहे!! कधी भेटण्याची इच्छा आहे!! कधी एकटा मी, तर कधी तू सोबती आहे!! कवितेतील तुला, सांगू किती मी!! कवितेचे कित्येक रंग, फक्त तूच आहेस!! शब्दांचिया नावे, उगाच दोष जातो!! कवितेत एक भाव तूच आहेस..!!" ✍योगेश खजानदार *All Rights Reserved*