“शब्दवेल ” जणु शब्दांची वेल.. पाहता पाहता अगदी सहज त्या मनाच्या भिंतीवर पसरलेली ही वेल केव्हा या मनाला व्यापून गेली कळलंच नाही, आणि या वेलीवरती उगवलेली ती फुल म्हणजे या कविता. या कविता कागदावर येऊन जणु आपल्या भावनांचा गंध पसरतात असच वाटतं. आणि उरतात त्या आठवणी !! कळत नकळत मनात साठवलेल्या. अशाच काहीशा आठवांचा शब्दरूपी प्रपंच म्हणजे या कविता. माझ्या ब्लॉगवर मी नेहमी लिहीत राहतो. स्वतःला व्यक्त करत राहतो. म्हणूनच E-book च्या माध्यमातून आपणा सर्वांसमोर हा कवितासंग्रह मी ठेवत आहे. तुम्हाला नक्कीच कविता आवडतील .. कवितासंग्रह वाचून झाल्यावर आपल्या प्रतिक्रीया नक्की कळवा .. धन्यवाद

लेखक
योगेश खजानदार

Click Here TO Read ..

shabdvel (Marathi Edition) Kindle Edition

SHARE