"रोज मन बोलत आज तरी बोलशील!! रुसलेल्या तिला कशी आहेस विचारशील!! भांडलो आपण आता विसर म्हणशील!! डोळ्यातील आसवांना वाट करुन देशील!! मन तस वेडसर आठवणीत राहशील!! का भांडलीस माझ्याशी असा जाब विचारशील!! सोड सगळं आता घट्ट मिठी मारशील!! पुन्हा नाही भांडणार अस वचन देशील!! रोज मन बोलत आज तरी बोलशील!!" ✍️ योगेश