"आठवणींचा समुद्र आहे जणु तु सतत लाट होऊन का यावीस!! कधी मन ओल करुन माझे तु पुन्हा का परतावी!! वार्यासवे कधी वाहताना मी तुझी वाट त्यास सांगावी!! ती प्रत्येक झुळुक तेव्हा तुझा भास होऊन का यावी!! कधी त्या रात्रीस उगाच मी तुझी वेडी आस का लावावी!! तुला भेटण्यास तेव्हा त्या चंद्राने ही वाट का पहावी!! तुला शोधण्यास आज ती वेडी रात्र का निघावी!! तुझ्या सावल्यांची तेव्हा ती उगाची खुण का शोधावी!! सांग सखे का असे ही वेडी प्रित मी जपावी!! तु नसताना या मनाची कोणी समजुत घालावी!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
