Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कथा

विरोध || शेवट भाग || Marathi katha ||

Category कथा
विरोध || शेवट भाग || Marathi katha ||

Content

  • शेवट भाग

  • *समाप्त*
Share This:

शेवट भाग

“प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु !!” सूरज कित्येक विचारात हरवून गेला. त्याच्या मनाने आता विरोध केला.


बघता बघता सकाळ झाली. सूरज रात्रभर झोपलाच नाही. त्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक दिसू लागली होती. थोड्या वेळाने प्रिती ही जागी झाली. पटापट आवरू लागली. सूरज तिथेच बसून होता. समोर जळती सिगारेट तशीच होती. दोघांमध्ये एकही शब्द संभाषण होत नव्हतं. थोड्या वेळाने सगळं आवरून प्रिती बाहेर जायला निघाली. दरवाजा जवळ जाताच सूरज तिला विचारू लागला.


“कुठ चाललीस प्रिती ??”
“तुला काय करायचं रे !”
“मला काय करायचं म्हणजे !! तुझा नवरा आहे मी प्रिती !!”
“आहे नाहीस !! होता !! माझं आणि तुझ नात कालच संपलं !! आता फक्त कोर्टात एकदा डिव्होर्स भेटला की झालं !!””दहा वर्षाचा संसार !! असा एका क्षणात तोडता येतो!! “
“तुझ्यासाठी असेल हा संसार !! माझ्यासाठी नरक आहे हा !!” प्रिती दरवाजा थोडा उघड म्हणाली.
“प्रत्येक ठिकाणी हेच !! नाती म्हणजे तुझ्यासाठी बाहुल्यांचा खेळ आहेना !! कधीही मांडला आणि तोडला !! पण आता नाही !! प्रिती माझा अंत पाहू नकोस !!नाहीतर !!” सूरज तिचा हात ओढत म्हणाला.

प्रिती दरवाजा समोरून लांब गेली. सूरजने दरवाजा बंद केला.


“हा काय वेडेपणा लावलायस तू सूरज !! “
“वेडेपणा मी करतोय ??  तू तू वेडेपणा करते आहेस !! काय कमी केलं मी तुला !! की एका क्षणात मला सोडून त्या अनिकेतकडे चालली!! “
“कारण माझं प्रेम आहे त्याच्यावर !!”
“आणि माझ्यावर कधीच केलं नाहीस प्रेम !!”
“नाही !!” 


सूरज शांत झाला. दरवाजा समोरून बाजूला सरकत सिगारेट पेटवून ओढू लागला. प्रिती रागात बाहेर निघून गेली. सूरजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या मनात फक्त प्रितीचे ते शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. पण तो लगबगीने उठला घरातून बाहेर पडला. इकडे प्रिती अनिकेतच्या घरी आली समोर दरवाजा उघडताच श्वेता समोरच होती. प्रितीला पाहून श्वेता तिला बोलली.


“अरे प्रिती ताई !! या ना !! एवढ्या सकाळी येणं केलं !! “
“अनिकेत कुठ आहे !!” प्रिती आत हॉल मध्ये येत म्हणाली.
“ते आहेत !! आवरत आहेत !! ऑफिसला जायचं ना !!””बसा ना !! ”  एवढं म्हणून श्वेता घरात निघून जाते.

थोड्या वेळात अनिकेत प्रिती समोर येतो. प्रिती त्याला पाहून त्याच्या जवळ जाते त्याला मिठी मारत कित्येक गोष्टी बोलू लागते.
“अनिकेत !! मला माफ कर !! पण मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय !! या या तुझ्या बायकोमुळे तू मला नाकारतो आहेस हे माहिती मला!!! चल ना !! आपण पुन्हा आपल्या आयुष्यात एकत्र येऊत !!” 


अनिकेत आणि श्वेताला प्रितीच हे वागणं धक्कादायक होत. क्षणभर ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. आणि अनिकेत प्रितीला आपल्यापासून लांब करतो.


“प्रिती तुला कळतंय का !! तू वेडी आहेस का !! तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का !! ” अनिकेत प्रितीला समजावून सांगू लागला.
“हो !! झालिये मी वेडी !! तुझा तो स्पर्श आजही आठवला की मला बैचेन होत !!तुझी ती मिठी मला वेड करते !! अनिकेत मला माफ कर !! आणि चल माझ्या सोबत !!”
“प्रिती तू समजुन घे आता !! आणि please जा निघून इथून !!” 
“सूरज ही तितकंच प्रेम करतो तुझ्यावर !! बघ एकदा नात्यांकडे त्या !!”
“नाही नाही नाही !! मला नकोय ते!”


अचानक दरवाजा जोरात उघडल्याचा आवाज झाला.डोळ्यात आग, मनात आता या प्रेमाचा तिरस्कार आणि हे सगळं खोटं आहे हे मानायला विरोध. सूरजला पाहून प्रिती आश्चर्यचकित होते. त्याला पाहून बोलते.


“तू इथ काय करतोयस !!”
“तुझी नाटक संपवायला आलोय मी !! “
“सूरज तू घरी जा !! उगाच इथे तुझा तमाशा नको आहे !!”
“आणि तू काय करतेस ??स्वार्थी , ढोंगी बाई!! अनिकेत सारख्या खर प्रेम करणाऱ्याला माझ्याकडे पैसा होता म्हणून सोडून माझ्या मागे आलीस !! आज पुन्हा अनिकेत दिसला की त्याच्या मागे चाललीस !! उद्या आजुन कोणी आला तर !” सूरज खूप काही बडबड करू लागला.
“सूरज शांत हो!! आत ये !! आपण शांत बोलुयात !! ” अनिकेत सूरजला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.
“अनिकेत तू आता मध्ये पडू नकोस !! ” सूरज आपल्या जवळील पिस्तुल काढत म्हणाला.
अनिकेत श्वेता दोघेही आता गोंधळून गेले. सूरजने पिस्तुल प्रितीवर ताणले. 
“सूरज !! हा मूर्खपणा आहे !!  अनिकेत तू तरी सांग ना !! ” श्वेता स्वतःला सावरत म्हणाली.
“मारायचं मला !! मारून टाक !! ” प्रिती मोठ्या आवजात बोलू लागली.
“प्रिती ही चेष्टा नाही !! आपल्या नात्याचा अंत आहे !!” 


सूरज असे म्हणताच त्याने प्रितीवर गोळी झाडली. प्रिती क्षणार्धात जमिनीवर कोसळली. अनिकेत तिला सावरायला पुढे गेला. श्वेता सुन्न होऊन पाहत राहिली.
“प्रिती !! प्रिती !! हे काय काय केलंस तू सूरज !! माझा या नात्याला विरोध होता !! पण प्रिती माझं प्रेम आहे सूरज !! ” प्रिती तुटक बोलण्याचा प्रयत्न करू लागली. अनिकेत श्वेताला म्हणू लागला.
“श्वेता ambulance बोलावं लवकर !! ” 


समोर सूरज भिंतीला टेकून खाली बसला. श्वेता ambulance ला फोन लावू लागली. प्रिती तुटक तुटक अनिकेतला बोलण्याचा प्रयत्न करत होती.
“अ .. अ..अनिकेत!! “
“प्रिती तुला काहीही होणार नाही !! “
“अनिकेत !! I .. i … Hate .. you …!!” 


अखेरचे शब्द बोलुन प्रिती कायमची शांत झाली. अनिकेत आणि श्वेता सुन्न बसून राहिले. समोर सूरज पाहताच अनिकेत रागात बोलू लागला.


“काय केलंस तू कळतंय का तुला सूरज !! “
“अनिकेत तू शांत हो !!” श्वेता अनिकेतला सावरू लागली.
“ज्या नात्याला काहीच अर्थ उरला नसेल ते ठेवून तरी काय करायचं !! मला माफ कर अनिकेत !!”


क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सूरजनेही आपल्या डोक्यावर पुस्तुल ताणली अनिकेत त्याला आडवयाला पुढे जाणार तेवढ्यात सार काही संपून गेलं. रक्ताच्या थारोळ्यात सूरज आणि प्रिती पडले होते. अनिकेत आणि श्वेता कित्येक वेळ सुन्न राहिले. थोड्या वेळाने पोलिसांनी येऊन पंचनामे केले. प्रिती आणि सुरजच्या खुनाचा संशय घेऊन पोलिसांनी अनिकेत आणि श्र्वेताची चौकशी केली. पण अखेर सत्य समोर आले.


अनिकेत आणि श्वेता या घटनेनंतर शांत झाले. त्या घरापासून दूर निघून गेले. ते घर , ते ऑफिस ,तो सूरज आणि ती प्रिती या सगळ्या पासून दूर निघून गेले.


“अनिकेत !! या सगळ्यात चूक कोणाची ??”
“आता चुकलं कोण हे ठरवून तरी काय करायचं !!”


श्वेता काहीच बोलत नाही. दोघे कित्येक वेळ मावळतीचा सूर्य पाहत बसतात. आपल्या नव्या आयुष्याची वाट शोधत राहतात.


*समाप्त*

विरोध || कथा भाग ५ ||
विरोध || कथा भाग १ ||

Yogesh Khajandar

Author || Content Writer || Blogger ||

Tags अनिकेत प्रिती वेडेपणा शेवट भाग Marathi Stories Poems And Much More!!

RECENTLY ADDED

वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

श्रीविष्णु वंदना || Devotional || Shrivishnu Vandana ||

श्रीव्यंकटेश ध्यानम् || Shrivyankatesh Dhyanam ||

अथ ध्यानम् ॐ श्रीवत्सं मणिकौस्तुभं च मुकुटं केयूरमुद्रांकितम‌् । बिभ्राणं वरदं चतुर्भुजधरं पीतांबरीद्भासितम् ॥ १ ॥
man sitting on the mountain edge

आरजु || AARAJU || HINDI || POEM ||

दुआयें मांगी थी मिन्नतें मांगी थी भगवान के दर पे सब बातें कही थी फिर भी न कोई आवाज ना कोई मदत मिली थी पत्थर दिल है भगवान सच्ची आरजू न सुनी थी
भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||

भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||

१. ॐ कुबेराय नमः। २. ॐ धनदाय नमः। ३. ॐ श्रीमाते नमः। ४. ॐ यक्षेशाय नमः। ५. ॐ गुह्य​केश्वराय नमः। ६. ॐ निधीशाय नमः। ७. ॐ शङ्करसखाय नमः।
Dinvishesh

दिनविशेष ५ नोव्हेंबर || Dinvishesh 5 November ||

१. कोलंबिया देशाने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९४५) २. भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरुवात केली. (२०१३) ३. उलिसेस एस. ग्रँट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. (१८७२) ४. जॉन ए. मॅकडोनाल्ड यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१८७३) ५. फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हे अमेरिकेचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९४०)
गोसूक्त || Gosukt || Devotional ||

गोसूक्त || Gosukt || Devotional ||

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभिः । प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदितिं वधिष्ट ॥ १ ॥ आ गावो अग्मन्नुत भद्रमक्रन्त्सीदन्तु गोष्टे रणयन्त्वस्मे । प्रजावतीः पुरुरुपा इह स्युरिन्द्राय पूर्वीरुषसो दुहानाः ॥ २ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest