भाग ५
अनिकेतलाही आता प्रितीच्या अश्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रितीला थोड लांब करत तो तिला बोलू लागला.
“पण मला तुला बोलायचं नाहीये प्रिती !! तुला कळत कस नाहीये की हे आता शक्य नाहीये !!! तुझ लग्न झालंय प्रिती !! आणि मीही माझ्या संसारात, आयुष्यात सुखी आहे !! “
“मग सोडून देऊयात हे सगळं अनिकेत !! मला फक्त तू हवा आहेस !!”
“इतकं सोपं असतं हे सगळं सोडण प्रिती!! नात सोडणं आणि जोडणं तुझ्यासाठी सोपं असेन !! माझ्यासाठी नाही !! कित्येक अश्रू वाहून गेले तुझ्या आठवणीत !! तेव्हा या श्वेताने मला सावरलं !! आणि माझं प्रेम आता फक्त श्वेता आहे !!”
“म्हणजे तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाही ?”
“नाही !!” अनिकेत एवढंच बोलतो आणि गाडीत बसून निघून जातो. प्रिती कित्येक वेळ तिथेच बसून राहते.
“नात जोडणं आणि तोडण नसेल कदाचित इतकं सोपं !! पण तुला गमावून मी चूक केली हे मात्र मला मान्य आहे अनिकेत !! तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम पाहिलंय!! माझ्यासाठी तुझी ओढ पण पाहिली मी !! आज कित्येक वर्षांनंतर तू मला भेटलास !! या काळाने तुझ प्रेम थोड हरवून गेलंय !! मी त्याला शोधणार नक्की!!! नक्कीच शोधणार !!”
प्रिती डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली. तेवढ्यात समोर श्वेता येताना तिला दिसते. श्वेता प्रिती जवळ येत म्हणते.
“तुम्ही इथे ??”
“हो आले होते भेट घ्यायला !! पण आता उगाच आले अस वाटायला लागलं!!” प्रिती तुटक बोलते.
“म्हणजे ??” श्वेताला काहीच कळत नाही.
“काही नाही !! सहजच आले होते !! चल येते मी !!” प्रिती निघायला लागते.
“आलाच आहात तर चला ना घरी !!”
“नाही नको !! येईल नंतर ! ”
“प्रिती ताई एक बोलू !! भूतकाळाच्या आठवणीत एवढं गुंतू नये कधी !!त्रास होतो !!”
“आणि तो भूतकाळ विसरता येत नसेल तर ??”प्रिती श्वेताकडे पाहत म्हणते.
“तर आयुष्यात अजुन खूप काही करायचं आहे हे म्हणून चालत राहायचं !!आपल्या जवळच्या लोकांसोबत !! “
“आणि जवळचे लोक आपली साथ द्यायला तयार नसतील तर !!”
“जे आयुष्यात आपली साथ सोडून जातील ते आपले कोण ??” श्वेता प्रितीच्या डोळ्यात पाहते.
प्रितीला श्वेता काय म्हणते आहे हे लगेच कळत ती काहीच न बोलता निघून जाते.
“सुंदर वळणावर आयुष्य जात असताना मध्येच अचानक मोठा डोंगर यावा असं काहीसं माझं का व्हावं मलाच कळत नाही !! मागे जावं तर आठवणी छळतात आणि पुढे यावं तर त्याच आठवणी यक्ष बनून आपल्या समोर उभ्या राहतात, ही कोणती गोष्ट मलाच कळतं नाही. माझं पहिल प्रेम म्हणून आजही तिचंच नाव या ओठातून माझ्या निघत. पण ते पहिलं प्रेम आता फक्त एक आठवण असेल तर काय करावं काहीच कळत नाही!! पण म्हणतात ना , प्रेम करणं सोपं असतं, पण जो आयुष्यभर आपली साथ देईल तेच आपलं खर प्रेम असत!! माझ्या सगळ्या परिस्थतीमध्ये श्वेताने मला साथ दिली , माझ्या खिशात दमडा नव्हता त्यावेळी ती माझ्यासोबत खंबीरपणे सोबत होती, मी हसलो ती हसली , मी रडलो ती रडली काय नि काय !! माझी श्वेता !!आजही माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे !!” अनिकेत ऑफिसमध्ये स्वतःत गुंतून गेला होता.
आज पार्कींग मध्ये त्याच्या मनात नसतानाही त्याने प्रितीला खूप काही सुनावलं होत. तुझ्या लेखी माझी किंमत किती या प्रश्नाला खरतर त्याला माझ्या लेखी तुझी किंमत अनमोल आहे अस म्हणायचं होत. पण अशाने तिचा हा वेडेपणा वाढला असता म्हणून अनिकेत तिला रागात बोलला. हाच विरोध तिने मला सोडून जाताना स्वतःचा मनाशी , त्या खोट्या नात्याशी केला असता तर कदाचित ती या परिस्थितीत आलीच नसती. पण मला सगळंच हवं हे विचार तिला सुखी होऊ देत नाहीत.
अनिकेत आज ऑफिसमधून घरी लवकरच आला. श्वेताला त्याने पार्कींग मध्ये प्रिती भेटली होती याबद्दल सगळं काही सांगितलं. श्वेताने ती पुन्हा तिला भेटली होती हेही सांगितलं. सगळं काही शांत असताना कित्येक वेळ अनिकेतचा मोबाईल वाजत राहतो. प्रिती त्याला खूप वेळ झालं फोन करत राहते. अनिकेत मोबाईल बंद करून ठेवतो. इकडे प्रिती बैचेन होते ,
“याला कळत नाही का !! माझ्या फोनला उत्तर द्यायचं !! पहिलं तर माझ्या सारख मागेपुढे करायचा आता ही श्वेता आली तर जास्त शहाणा झालाय हा अनिकेत !!” प्रिती गॅलरी मध्ये बसून बोलत असते.
आत सूरज निवांत पुस्तक वाचत बसलेला असतो. त्याला प्रितीच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो.
“मूर्ख कुठला !! ” प्रिती मोबाईल जोरात जमिनीवर आदळते. मोबाईलचे तुकडे तुकडे होतात.
सूरज धावतच गॅलरी जवळ येतो. खाली तुटलेला मोबाईल पाहत तो म्हणतो.”काय झालं प्रिती ?? आणि मोबाईल का असा तोडलास ??”
“तू जा बर सूरज इथून !! आधीच माझं डोकं दुखतंय तू अजून नको त्रास देऊस !! “प्रिती आत खोलीत जात म्हणाली.
प्रिती खोलीत जाताच अडखळून पडते. पडल्यामुळे तिच्या पायाला जखम होते. सूरज धावत जाऊन मलमपट्टी घेऊन येतो.
“जरा नीट बघून चालायचं ना !!” जखमेवर मलम लावत सूरज तिला म्हणतो.
प्रिती स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत राहते.
“उठू नकोस !! थांब जरा वेळ!!”
“राहू दे बर तू !!” प्रिती सूरजला लांब करत म्हणते.
“अस करू नकोस प्रिती !! काय कमी आहे आपल्यात सांग ना. !!सगळं काही आहे आपल्याकडे!! तू आहेस तर मी आहे प्रिती !!” सूरज प्रितीच्या डोळ्यात पहात म्हणतो.
त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागतात.प्रिती फक्त पाहत राहते काहीच न बोलता तसेच ती जागेवरून उठून आत जायला लागते. आणि तेवढ्यात मागे वळून म्हणते.
“मला divorce पाहिजे सूरज !!!”
“काय बोलतेय तू कळतंय का तुला प्रिती !!”
“हो !! मला तुझ्यापासून divorce हवा आहे!! माझा हा निर्णय अंतिम आहे “
“असा वेडेपणा करू नकोस प्रिती !! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो !! तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार !!”
प्रिती पुढे काहीच बोलत नाही. ती खोलीत निघून जाते. सूरज भरल्या डोळ्यांनी आपल्या संसाराची झालेली वाताहत पाहत राहतो. हताश होतो. त्याच मन सुन्न होत. डोळ्या समोर फक्त अंधार होतो. रात्रभर त्या गॅलरी मध्ये बसून तो प्रितीच्या आणि त्याच्या कित्येक गोड आठवणीं पाहत राहतो. कित्येक वेळ सिगारेट ओढत राहतो.