भाग ४
मेसेज टोन वाजताच अनिकेत श्वेता पासून लांब जातो. मोबाईल मध्ये पाहतो आणि पुन्हा मोबाईल खिशात ठेवून तिच्या जवळ येतो. श्वेता अनिकेतकडे पाहत राहते आणि बोलते.
“अनिकेत एक विचारू ??”
अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो.
“विचारतेस काय !! बोल ना !!”
“आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??”
अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो.
“नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!”
“मग असा गप्प गप्प का आहेस ?”
“नाही तर !!” अनिकेत नजर चोरत बोलतो.
श्वेता त्याचं वागणं बरोबर ओळखते.
“कॉफी घेशील ?”
“हो चालेल कर!!”
श्वेता कॉफी करायला आत निघून जाते. तेवढ्यात अनिकेत मोबाईल खिशातून बाहेर काढतो आणि मेसेज वाचू लागतो.
“अनिकेत !! आज मी तुझ्या घरी आले होते!! तुझ्या बायकोला भेटले! छान वाटलं !! पण आता मला एक क्षणही तुझ्यापासून दूर राहणं जमत नाही!! मी काय करू सांग ना रे !! तुझा अबोला !! तुझा राग मला छळतोय रे !! अनिकेत !! मला बोल ना रे !!”
अनिकेत मेसेज वाचून मोबाईल ठेवून देतो. श्वेता कॉफी घेऊन येते.
“घे !! कसा गेला आजचा दिवस ?” श्वेता अनिकेत समोर बसतं बोलते.
“छान होता !! ऐक ना श्वेता !! मला तुला काही सांगायचं आहे !! “
“मला माहितेय तुला काय सांगायचं आहे ते !!प्रिती ना ??” श्वेता अनिकेत जवळ येत म्हणाली.
“तुला कसं माहिती !! प्रिती ने सांगितलं ??”
“नाही रे !! त्या दिवशी तिच्या डोळ्यात मी तुझ्याबद्दलच प्रेम ओळखलं होत अनिकेत !! “
“प्रेम नाही ते !! स्वार्थ आहे !!” अनिकेत एकदम बोलला.
“अस का म्हणतोय तू अनिकेत !!” श्वेता कॉफीचा कप बाजूला ठेवत म्हणली.
“कारण !! जी व्यक्ती एका क्षणात नात तोडून निघून जात असेल !! आणि आज अचानक पुन्हा जोडण्याचा मूर्ख अट्टाहास करत असेल त्याला दुसर काय म्हणावं तूच सांग !!! ” अनिकेत श्वेताचा हात हातात घेत म्हणाला.
“पण ती इतक्या वर्षात तुला विसरली सुद्धा नाही !! हेही खरं आहे ना ??”
“पण त्या आठवणींना काय किंमत ?” अनिकेत श्वेताच्या डोळ्यात पहात म्हणतो.
श्वेता काहीच बोलत नाही. अनिकेत तिला त्याच्या आणि प्रितीच्या भूतकाळातील नात्याबद्दल सगळं काही सांगतो. श्वेता सगळं काही ऐकुन घेते आणि म्हणते.
“पैसा नात जोडतो हे मान्य !! पण ते नात पैश्यासोबतच निघून जात हेही खरं !! “
“पण श्वेता ! एवढं सगळं लक्षात येऊनही तू मला एका शब्दाने बोलली नाहीस आज !! का ??”
“कारण अनिकेत माझा तुझ्यावर विश्वास आहे !! मला माहित होत हे सगळं तू मला नक्की सांगशील ते!!”
अनिकेत काहीच बोलत नाही. आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजतो. तो पाहतो तर तो कॉल प्रितीचा असतो. श्वेताला ते लक्षात येत. ती म्हणते.
“कोणाचा आहे फोन !! उचल ना !!”
अनिकेत फक्त मोबाईल स्क्रिन तिला दाखवतो.
“मी बोलते तिला !! ” अस म्हणत श्वेता अनिकेतचा मोबाईल घेते आणि फोन उचलते.
“हॅलो!!”
श्वेताचा आवाज ऐकुन प्रिती थोड्या चिडल्या आवाजात म्हणते.
“अनिकेत कुठे आहे ??”
“ते बाहेर गेलेत!! कोण बोलतंय ??”
“प्रिती बोलते ! आणि त्याला सांग !! आला की कॉल कर म्हणून. !! काम आहे !!”
“मला सांगा काय काम आहे !! मी सांगेन त्यांना !!”
“नाही काही गरज नाही त्याची !!” एवढं बोलून प्रिती फोन कट करते . श्वेता मोबाईल अनिकेतकडे देत म्हणते.
“बघ ना अनिकेत !! आयुष्याची सुंदर पान जेव्हा आपण लिहीत असतो तेव्हा कोणीतरी येत आणि दुसऱ्या आयुष्याची !! दुसऱ्या स्वप्नांची ओढ देत आणि या पानांना अर्धवट सोडून त्या खोट्या आयुष्याच्या मागे आपण लागतो!! पण जेव्हा ही आपली चूक आहे हे लक्षात येतं तेव्हा वेळ खूप पुढे निघून गेलेली असते, अस वाटत ना !! तसचं काहीस प्रितीच झालं !! “
“तिला खूप समजावून सांगितलं मी !! पण ती पुन्हा त्या तिथेच येते!! ती चुकली हे मान्य !! मी त्याबद्दल तिला माफही केलं ! पण याचा अर्थ असा नाही की पुन्हा ते नात जिवंत होईल !! “
“जिवंत तर आहेच रे ते अनिकेत !! तुझ आजही ते पहिलं प्रेम आहे हे तूही मान्य करतोस ना !!”
“हो पण आता त्या गोष्टीला अर्थ राहतोच कुठे ??”
“नात्याला अर्थ शोधायचा नसतो रे ! शोधावं ते प्रेम नात्या मधल!! तो जिव्हाळा !!”
“आणि तेच आता उरलं नाही !! आणि आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस श्वेता !! आणि मला यामध्ये कोणतीही तडजोड करायची नाहीये!! आणि हेच मी तिला सांगत होतो!!” अनिकेत श्वेताला जवळ घेत म्हणाला.
श्वेता हे ऐकुन अनिकेतकडे पाहत हलके हसते. जणू त्याला आपल्या प्रेमाची साथ देते. हळू हळू ते दोघेही एकमेकात गुंतून जातात.
त्या रात्री अनिकेत आणि श्वेता एकमेकांत रमून गेले. त्याच्या मिठीत श्वेता स्वतःला हरवून गेली. तिच्या ओठांवरील त्या चुंबनात अनिकेतच्या प्रेमाची गोडी होती.जणू ते ऐकमेकांस कित्येक भाव बोलत होते.
“क्षणात शोधावे प्रेम असे की
तुझ्यात मी हरवून जावे
साऱ्या गोड आठवणीत तेव्हा
चित्र मज तुझे दिसावे
ओठांवरच्या गोड चुंबनात
सारे प्रेम रिते व्हावे
मिठीत त्या तुझ्या मी तेव्हा
नकळत प्रेम व्यक्त करावे!!”
नव्या दिवसात पुन्हा अनिकेत आणि श्वेता आपल्या आयुष्याच्या वाटेवर लागतात. अनिकेत सकाळी लवकर आवरून ऑफिसला जायला निघतो. श्वेता त्याला नाष्टा घेऊन येते. अनिकेत नाष्टा करून ऑफिसला निघतो. पार्किंग मध्ये गाडी जवळ येतो. समोर गाडी जवळ त्याला प्रिती उभारलेली दिसते. तो काहीच न बोलता गाडी उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रिती गाडीचा दरवाजा जोरात बंद करत त्याला म्हणते.
“मला तुला बोलायचं आहे अनिकेत !! एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला ??”