विरोध || कथा भाग २ || MARATHI STORY ||

भाग २

आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असच काहीसं अनिकेतला वाटत होत. रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही. प्रिती त्याच्यासाठी आता फक्त एक भुतकाळ होता. पण तो भुतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळल नव्हतं. तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत नेलं होतं.

विचारात रात्र अशीच सरून गेली. उगवतीच्या सूर्याने नवी स्वप्ने देऊ केली. सकाळी लवकर उठून अनिकेत ऑफिसला जायला निघाला. सगळी आवरा आवर करत असताना. मोबाईलची मेसेज टोन वाजते. अनिकेत मेसेज पाहून क्षणभर विचारात पडतो आणि मेसेज वाचू लागतो.

” अनिकेत !! तुझ ते काल मला अचानक भेटन खरंच खूप छान होत. तुझ्या आयुष्यातून मी गेल्यानंतर, पुन्हा मी तुला खूप शोधलं, पण तू मला पुन्हा कधीच भेटला नाहीस!! पण आता देवाने आपली भेट पुन्हा घडवून आणली आहे !! मला तुला पुन्हा भेटायचं आहे!! भेटशील ??”

अनिकेत मेसेज वाचून क्षणभर विचारात पडतो. काहीच प्रतिक्रिया न देता मोबाईल बंद करून आवरू लागतो.पुन्हा मेसेज टोन वाजते.अनिकेत पुन्हा मेसेज वाचू लागतो.

“तुझा राग मी समजू शकते. पण त्याच कारण तरी काय हे ऐकुन घेशील का??मला पुन्हा भेटशील का ??”

अनिकेत पुन्हा मोबाईल बाजूला ठेवून देतो. तेवढ्यात श्वेता त्याच्या जवळ येते. हातातील नाश्ता त्याला देत म्हणते.

“काय झालं ?? आज एवढा उशीर का होतोय तुला ??बरा आहेस ना ??”
“मी बरा आहे !! मला काय होणार आहे !! ” अनिकेत हसत बोलतो. तेवढ्यात शेजारी ठेवलेला मोबाईल पुन्हा वाजतो.
“काय रे !! कोणाचा मेसेज येतोय !! बघत का नाहीयेस !!”
“कंपनीचा आहे !! जाऊदे चल मी निघतो !!”

श्वेताला खोट बोलून अनिकेत ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये सुद्धा त्याला काय करावं काहीच कळत नाही. कित्येक मेसेज येऊन गेल्यानंतर प्रिती त्याला फोन करते. कित्येक वेळा फोन वाजून गेल्यानंतर अखेर अनिकेत फोन उचलतो.

“हॅलो!!”
“प्रिती बोलते !!”
अनिकेत काहीच बोलत नाही.
“अनिकेत मला तुला भेटायचं आहे !!तू अस का करतोयस ??”
“पण मला तुला भेटायचं नाहीये आता !!” अनिकेत रागात येऊन बोलतो.
“आणि प्लीज !! हे मेसेजेस करणं !! बंद कर!!”
“एवढा राग आहे माझ्याबद्दल ??”
“राग नाहीये !! पण आता तू ती प्रिती नाहीयेस आणि मी तो अनिकेत पण राहिलो नाहीये !!”
“हे बघ अनिकेत एवढा माझा द्वेष करू नकोस !! Please एकदा भेट !! तिथेच !आज संध्याकाळी ! “
“ठीक आहे !! अगदी शेवटचं !!”

अनिकेत भेटण्याचं ठरवून मेसेजेस आणि कॉल्स मधून सुटका करून घेतोय अस त्याला वाटलं. आयुष्याची कित्येक वर्षे सरून गेल्या नंतर काय बोलायचं आहे, पण ती पुन्हा का आयुष्यात आली या विचाराने त्याला पुरत हैराण करून सोडलं होत.बघता बघता संध्याकाळ झाली, अनिकेत प्रितीला भेटायला जातो. तेव्हा ती तिथे त्याच्या आधीच येऊन बसलेली असते. दोघेही समोरासमोर कित्येक क्षण गप्प बसतात आणि अखेर प्रितीच बोलायल सुरुवात करते.

“भेटायला आलास याचा खूप आनंद झाला !!”
अनिकेत अगदी थोड हसू चेहऱ्यावर आणून बोलतो.
“मलाही झाला असता तर बर झालं असत !!”
प्रिती काहीच बोलत नाही. क्षणभर शांत राहते आणि बोलते.
“दहा वर्ष लोटली या सगळ्या गोष्टींना !! राग आजही आहे ??”
अनिकेत फक्त तिच्याकडे पाहत राहतो.
“आजही तितकच प्रेम करतोस माझ्यावर ??” प्रिती अगदिक होऊन विचारते .
“नाही !! ” अनिकेत क्षणात बोलतो.
“श्वेता!! तुझी बोयको तुम्ही मजेत आहात!! पाहून छान वाटलं !!”
अनिकेत फक्त ऐकत राहतो.
“दहा वर्षात कित्येक वेळा तुझी आठवण मला आली !! पण मी खूप शोधूनही मला तू सापडला नाहीस !!”
“सूरज प्रेम करत नाही तुझ्यावर ??” अनिकेत तिला विचारतो.
“करतो रे !! खूप करतो !! पण तुझी आठवण काही गेली नाही !!”
“एवढंच प्रेम होत तर जायचंच नव्हतं ना मला सोडून मग !! “
“ती माझी चूक होती !!” प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली.
“नाही प्रिती !! चूक नाही !! तो तू विचार करून केलेला निर्णय होता!! ” अनिकेत आता मोकळेपणाने बोलू लागला.
“म्हणजे??” प्रिती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
“म्हणजे !! मी भिकारी आणि तो सूरज श्रीमंत !! मी देऊन देऊन काय दिलं असतं !! पण सुरजचा पैसा , संपत्ती याची भुरळ पडली तुला!!”
“काय बोलतोयस तू अनिकेत !! अस काही नाहीये !! “
“मग कोणताही विरोध नसताना !! सर्वांची आपल्या नात्याला संमती असतानाही अचानक तू त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय का केलास ?? आणि जाऊ देना !! मला या विषयात आता पडायचं नाहीच !! मी निघतो !!” अनिकेत उठून निघतो.
“थांब अनिकेत !! आता मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाहीये !!”प्रिती त्याला अडवत म्हणते.
“आता खूप उशीर झालाय प्रिती !!!bye!!” अनिकेत निघून जातो.

अनिकेत गेल्यानंतर कित्येक वेळ प्रिती तिथेच बसून राहते. तिला तिचेच विचार छळु लागतात.

“अनिकेत बोलला त्यात काय चूक आहे प्रिती ! तू नात्याचा व्यवहार केलास!! तू पाहिलंस नात श्रीमंत आहे की गरीब !!तू मन कधी ओळखुच शकली नाहीस !! हो प्रिती तू चुकली आहेस !! तुझ्या आयुष्यात पैसा खूप आला !! पण प्रेम ?? नाहीना !! बघ !! अनिकेतने पुन्हा प्रेम केलं !! त्याच्या आयुष्यात श्वेता आली !! त्याच्यावर ती खूप प्रेम करते !! तुझ काय ?? फक्त पैश्यात नाती मोजणारा नवरा ?? की एक उजाड आयुष्य ?? प्रेम कुठे आहे तुझ प्रिती !! ते बघ तुझ खर प्रेम तर तुझ्यापासून दूर जातंय!! ” अचानक प्रिती भानावर येते आणि स्वतःला बोलते.

“नाही !! त्याला मी जाऊ देणार नाही !! तो माझा आहे !! तो माझा आहे !!”


क्रमशः 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *