विरोध || कथा भाग १ || VIRODH PREM KATHA ||

भाग १

“आयुष्यात खूप काही घडून गेल्यानंतर ,खूप काही हातून सुटल्यानंतर!! आपण एका अश्या वळणावरती येतो, अचानक अशा व्यक्तीला भेटतो की पुढे सारं काही आपलंस वाटायला लागतं!! असंच काहीसं श्वेता आयुष्यात आली तेव्हा झालं होत. पहिल्या प्रथम सगळं काही खोटं असतं !! प्रेम वगैरे सगळं बनावट असतं असा समज झाला होता. तसं वाटायला लागलं!! पण का कुणास ठाऊक, खूप काही गमावल्या नंतर, श्वेताने सगळी ही माझी गणिते चुकीची ठरवली!! खूप प्रेम करते ती माझ्यावर !! आणि मलाही पुन्हा प्रेम करायला शिकवले तिन्हे !! आज मिळालेलं यश फक्त तिचच आहे !! ती नसती तर हे शक्य नव्हतं !!!” अनिकेत कित्येक वेळ आपल्याच विचारात मग्न होता.

“अनिकेत !! अनिकेत !!” श्वेता बाहेरून आवाज देत खोलीत येते.
“अजुन तसाच आहेस तू ! आवर ना चल !”
“फक्त दोन मिनिट !! आवरतो लगेच !!”
“पटकन चल !! ” श्वेता बाहेर निघून जाते.

“माझ्यासारख्या सामान्य माणसाला , असामान्य वाटावं हीच खरी नात्याची ताकद असते !! या हजारो ,करोडो लोकांमध्ये ती आपली एक व्यक्ती !! आपल्या जवळची ती व्यक्ती, आपलं सर्वस्व !! ” अनिकेत आवरत विचार करत राहतो, आणि आवरून बाहेर येतो.

“मग आज कुठे जायचं ?” अनिकेत श्वेताला जवळ घेत विचारतो.
“कुठे म्हणजे काय !! आपल्या नेहमीच्या ठिकाणी !!”
“तिथेच ??”
“हो !! “
“चला मग !! “

अनिकेत आणि श्वेता दोघेही गाडीत बसून निघतात. श्वेता कित्येक वेळ रेडिओवर लागलेलं गाणं गुणगुणत राहते. दोघेही आज खुश असतात. थोड्याच वेळात ते तिथे पोहचतात.

“श्वेता आपण नेहमी इथेच का येतो माहितेय तुला ??”
“कारण तुला इथ येणं आवडत म्हणून !!” श्वेता समोरच्या खुर्चीवर बसत म्हणते.
“नाही !! चूक !!”
श्वेता आश्चर्याने अनिकेतकडे पाहते आणि विचारते.
“मग का ??”
“कारण , माझ जून आयुष्य इथेच संपलं , आणि नव्या आयुष्याला येथेंच सुरुवात झाली, तू मला भेटलीस !! इथेच !!” अनिकेत श्वेताच्या नजरेत पाहत म्हणाला.
“बरं ! ठीक आहे !! आता काही मागवूया !! खूप भूक लागली मला !! “
“मागव ना मग पटकन !! ” अनिकेत श्वेताकडे हसत पाहत म्हणाला.

अनिकेत आणि श्वेता कित्येक वेळ एकमेकांत अगदी मिसळून गेले. दहा वर्षाचा संसार त्यांचा! अगदी मनसोक्त फुलला. श्वेता नेहमीच अनिकेत सोबत अगदी खंबीर पणें उभी राहिली. संसार अगदी सुखात चालला होता. खूप वेळ एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवल्या नंतर दोघेही घरी जायला निघाले.

“चला !! घरी जायचं की इथेच थांबायचं आज ??” अनिकेत श्वेताला मिश्किल हसत म्हणाला.
“थांबुयात ना मग इथेच !! ” श्वेता हसत म्हणाली.
“चला आता !! ” अनिकेत खुर्चीवरून उठतं म्हणाला.

दोघेही घरी परत जायला निघतात. अनिकेत श्वेताला बोलण्यात एवढा गुंग होऊन जातो की समोरून कोणी आलेलं त्याला कळतंच नाही. आणि तो समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकतो. खरतर ही भुतकाळाने पुन्हा घातलेली साद होती. ती व्यक्ती समोर अडखळते , अनिकेत सावरतो. आणि क्षणात मागे सरकतो.

“लागलं तर नाहीना ?” श्वेता विचारते.
अनिकेत मात्र फक्त पाहत राहतो.

“नाही !! लागलं नाही!! ” “अनिकेत बघून चालायचं ना रे !!”
“अनिकेत ??” ती व्यक्ती क्षणभर अनिकेतकडे पाहते आणि अचानक बोलते.
श्वेता पाहत राहते.
“Hii, प्रिती !!” अनिकेत प्रितीकडे पाहत म्हणतो.
“तुम्ही ओळखता एकमेकांना ??” श्वेता मध्येच बोलते.
“हो !! आम्ही दोघे एका कॉलेजमध्ये आणि नंतर काही दिवस एका ठिकाणी जॉबही एकत्र केला !!” प्रिती अगदी उत्साहाने सांगत होती.अनिकेत मात्र गप्प राहिला.
“तुम्ही दोघे ??इथे ?” प्रिती अनिकेतकडे पाहत म्हणाली.
“श्वेता माझी बायको !! ” अनिकेत श्वेताकडे हात करत म्हणाला.
“आज सहजच आलो होतो!! “
“यांना इकडे या ठिकाणी यायला खूप आवडतं !! म्हणून येत असतो कधी कधी इथे !!” श्वेता मध्येच बोलते.

अनिकेत प्रितीला अनपेक्षित भेटून अगदी स्तब्ध झाला. त्याला खरतर तिने पुन्हा भेटणं नको होत. प्रिती हे अनिकेतच पहिलं प्रेम. पण या मनावर आता फक्त श्वेता होती.

“यांना कंपनी मध्ये बढती मिळाली !! आता हे प्रोजेक्ट हेड म्हणून राहणार !! मग या आनंदात एक छोटी पार्टी म्हणून आम्ही इथे आलो !!”
“अच्छा!! ” प्रिती श्वेताकडे पाहत म्हणाली.
अनिकेत मात्र अबोल राहिला. पण प्रितीच्या डोळ्यात त्याला ती पूर्वीची ओढ दिसल्या वाचून राहिली नाही.
“तुम्ही काय करता !!” श्वेता आता अगदी मनमोकळ बोलू लागली.
“मी housewife आहे !! Husband बिझनेस करतात!! त्यामुळे जास्तवेळ तर बाहेरच राहतात !!” प्रिती अनिकेतकडे पाहत राहते.
“अच्छा!! ते आले नाहीत बरोबर ? ” “आलेत ना !! कुठे राहिले मागे ,काय माहित !! ” प्रिती मागे पाहते. आणि तेवढ्यात तिच्या जवळ तिचा Husband येतो.”
हे माझे husband!! सुरज उपाध्याय !!””नमस्कार !! प्रिती!! मी पुढे जातोय !! तुझ झालं की ये लगेच !!” सूरज लगेच निघून जातो.श्वेता अनिकेत बघत राहतात. क्षणभर शांतता राहते. आणि मग प्रिती बोलते.

“तुम्ही चला ना आमच्या सोबत !!”
“नाही नको!! तुम्ही करा एन्जॉय !! आम्ही निघतोय आता !!” अनिकेत मध्येच बोलतो.
“हा !! तुम्ही करा एन्जॉय !! असही परत अनिकेतला उद्या लवकर जायचं!! ” श्वेता प्रितीकडे पाहत म्हणाली.
“ओके!! भेटुयात मग पुन्हा !! अनिकेत तुझा नंबर दे ना !! भेटुयात नंतर सगळे निवांत !!” प्रिती अनिकेतकडे पाहत म्हणते.

अनिकेत क्षणभर शांत राहतो. त्याला प्रितीला नंबर द्यायचा नसतो आणि तेव्हा मध्येच श्वेता बोलते. दोघींमध्ये पुन्हा भेटण्याचं ठरत, नंबर घेतले जातात. दोघी कित्येक वेळ बोलत राहतात.

पुन्हा भेटण्याचं सांगून अनिकेत आणि श्वेता निघून जातात. प्रिती अचानक भेटल्याने अनिकेत थोडा विचलित होतो. ती अशी अचानक भेटेल असे त्याला कधीच वाटलं नव्हतं.घरी आल्यावरही तो कित्येक वेळ हाच विचार करत बसतो.


क्रमशः 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *